शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! Langya Virus ने वाढवलं टेन्शन; किडनी-लिव्हरवर करतोय अटॅक, 'ही' आहेत 12 लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 4:44 PM

1 / 9
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. यानंतर मंकीपॉक्सने देखील जगाची चिंता वाढवली आहे. सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोना व्हायरस आणि मंकीपॉक्सनंतर आता आणखी एका व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. Langya Virus मुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2 / 9
चीनमध्ये langya virus आढळला आहे. ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार या व्हायरसच्या प्रभावामुळे आतापर्यंत 35 लोक संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. चीन आणि सिंगापूरच्या वैज्ञानिकांद्वारे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडीसीन (NEJM) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालामध्ये असे सिद्ध झाले आहे की हा प्राण्यांमधून पसरला जाणारा Henipavirus किंवा langya henipavirus आजार असून ज्याला एलएवी (Layv) असेही म्हटले जात आहे.
3 / 9
हा व्हायरस माणसाला संक्रमित करू शकतो. चीनच्या शेडोंग प्रांतात आणि मध्य चीनच्या हेनान प्रांतात आढळला आहे. आतापर्यंत या दोन्ही प्रदेशांमध्ये या व्हायरसची 35 लोकांना लागण झाली आहे. हा रिसर्च 'अ जूनोटिक हेनिपाव्हायरस इन फेब्राइल पेशेंट्स इन चायना' या नावाने प्रकाशित केला गेला आहे. हा व्हायरस नेमका काय आहे, याची लक्षणे काय आहेत आणि हा किती घातक आहे? हे जाणून घेऊया.
4 / 9
पूर्व चीनच्या काही लोकांना ताप आला होता त्यांच्या गळ्यातील स्वॅबच्या नमुन्यांमध्ये नवीन हेनिपाव्हायरस आढळला. या रूग्णांचा काही दिवसांपूर्वीच प्राण्यांशी संपर्क आला होता. ही गोष्ट सर्वात आधी 2018 साली समजली. पण आता अधिकृतपणे या व्हायरसची ओळख पटली आहे. हा Paramyxoviridae शी निगडीत आहे. हेनिपावायरस तीन व्हायरसशी मिळता जुळता आहे.
5 / 9
ज्यामध्ये हेंड्रा वायरस (HeV), निपाह वायरस (NiV) आणि CedPV यांचा समावेश आहे. या आरएनए व्हायरसला अत्यंत घातक असे समजले जाते. या आधी हेनिपावायरस, हेंड्रा वायरस (एचईवी), आणि निपाह वायरस (एनआईवी) 1990 च्या दशकामध्ये आढळले होते आणि त्यांच्यामुळे मोठे संक्रमण सुद्धा झाले होते. या संक्रमणामुळे अनेक पशु आणि मनुष्यांना आपला जीव देखील गमवावा लागला होता.
6 / 9
तज्ज्ञांच्या मते या व्हायरसने संक्रमित असणाऱ्या रूग्णांमध्ये ताप, थकवा, खोकला, एनोरेक्सिया, स्नायूंमध्ये वेदना, घाबरणे आणि सतत अशक्त वाटणे ही लक्षणे प्राथमिक रुपात दिसतात. काही रूग्णांमध्ये ताप, चिडचिडेपणा, खोकला, एनोरेक्सिया, मळमळ, डोकेदुखी आणि उलटी ही लक्षणे देखील आढळतात. जर ही लक्षणे दिसली तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.
7 / 9
रिपोर्टमध्ये असे सांगितले आहे की हेनिपा व्हायरस संसर्ग झालेल्या रोगांमध्ये पांढऱ्या रक्तपेशी (white blood cells) ची संख्या कमी होऊ शकते आणि यामुळे लिव्हर आणि किडनी खराब होऊ शकते. करंट ओपिनियन इन वायरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या जुलै 2002 च्या एका संशोधनामध्ये असे म्हटले गेले की, हेनिपाव्हायरसचा मृत्यूदर 50 आणि 100% च्या दरम्यान आहे.
8 / 9
व्हायरस माणसांना संक्रमित करणाऱ्या अत्यंत घातक व्हायरसपैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) च्या म्हणण्यानुसार या व्हायरसचा मृत्यू दर 40% ते 75% या दरम्यान आहे. प्राथमिक अभ्यासामधून हे दिसून आले की हा प्राण्यांमधून संक्रमित होणारा रोग आहे. अजून हे स्पष्ट झालेले नाही की माणसांना नेमकी या व्हायरसची लागण कशी होते. आतापर्यंत हा व्हायरस मुंगूस, बकरी आणि कुत्र्यांमध्ये आढळला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 9
टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
टॅग्स :chinaचीन