Lata Mangeshkar: A unique tribute to Lata Mangeshkari, a replica sealed in a bottle
Lata Mangeshkar: लतादीदींना अनोखी श्रद्धांजली, कलाकाराने बाटलीत बंद केली प्रतिकृती By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 8:16 AM1 / 9गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. लतादीदींच्या निधनानंतर सोशल मीडिया भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 2 / 9फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपवर अनेकांनी त्यांचे फोटो, त्यांच्या व्हिडिओ आणि गाणी शेअर करत आठवणी जागवल्या. 3 / 9मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीहून आले होते. तसेच, अनेक बड्या हस्तींची उपस्थिती दिसून आली. 4 / 9लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन गुरुवारी (दि. 10) सकाळी रामकुंडानजीकच्या अस्थीविलय कुंडात करण्यात आले. मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने विधीवत कलशपूजन करून भावपूर्ण वातावरणात अस्थिविसर्जन करण्यात आले.5 / 9लता मंगेशकर यांच्या आठवणी कायम राहव्यात, त्यातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय मुंबईत होणार असल्याचे घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.6 / 9लतादीदींना विविध माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. नाशिकमध्ये 25 गायकांनी लतादीदींची गाणी गात त्यांना श्रद्धांजली वाहिली. 7 / 9ओडिशाच्या भुवनेश्वर येथील आर्टीस्ट एल. ईश्वर राव यांनी छोट्याशा बाटलीत लतादीदींची फ्रेम बनवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यासाठी, एक काचेचा तुकडा, पेपर आणि चमकता तारा याचा वापर केला. 8 / 9आर्टीस्ट ईश्वर यांनी यापूर्वी अशा अनेक कलाकृती बनविल्या आहेत. बंद बाटलीत एखादी फ्रेम बनविण्याची त्यांची कला प्रसिद्ध आहे. लतादीदींची फ्रेम कलाकृती बनविण्यासाठी त्यांना 4 दिवसांचा कालवधी लागल्याचं त्यांनी म्हटलं. 9 / 9ईश्वर राव हे ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्याच्या जाटनी गावातील रहिवाशी आहेत. यापूर्वी दुर्गा उत्सव म्हणजे नवरात्रीवेळी त्यांनी दुर्गामातेचीही अशीच कलाकृती बनवली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications