शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lata Mangeshkar : लष्कराचं वाहन दाखल, अमिताभ, राज ठाकरेंसह दिग्गज पोहोचले 'प्रभू कुंज'वर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 3:38 PM

1 / 12
भारतासह जगभरातील श्रोत्यांना अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर आज हरपला. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं.
2 / 12
लता दीदींच्या जाण्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. गेल्या २८ दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
3 / 12
भारतरत्न लता मंगेशकर यांचे पार्थिव 'प्रभूकुंज' या निवासस्थानी ठेवण्यात आलं असून दादर शिवाजी पार्क येथे लतादीदींच्या अंतिम दर्शनाची तयारी सुरू आहे.
4 / 12
लता दीदींचं पार्थिव त्यांच्या मुंबईतील प्रभू कुंज या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. या निवास्थानाबाहेर चाहत्यांसह दिग्गजांनी मोठी गर्दी केली आहे.
5 / 12
लता मंगेशकर अमर रहेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर घुमत आहे. याठिकाणी चित्रपट, राजकारण या क्षेत्रातील दिग्गजांची गर्दी पाहायला मिळत आहे.
6 / 12
लष्कर, हवाई दल, नौदल आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे प्रभू कुंजबाहेर संयुक्त संचलन केले जाईल. त्यानंतर पार्थिव शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना होईल.
7 / 12
लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन हे आपल्या नातीसह लता दीदींच्या प्रभूकूंज या निवासस्थानी पोहोचले.
8 / 12
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानातच अंत्यसंस्कार होणार आहेत. सर्वसामान्यांनाही लता दीदींचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. यासाठी शिवाजी पार्कच्या जिमखाना गेट येथून नागरिकांना प्रवेश देण्यात येणार.
9 / 12
लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबीयांसह प्रभूकुंज या लता दीदींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
10 / 12
पंतप्रधान मोदींसह व्हीआयपी व्यक्ती अंत्यदर्शनाला उपस्थित राहणार असल्यानं सारे अंत्यविधी शिवाजी पार्कमध्येच होणार आहेत
11 / 12
आतापर्यंत प्रभू कुंजला मंत्री सुभाष देसाई, जावेद अख्तर, अनुपम खेर, किशोर कुमार पुत्र अमित कुमार, पंकज उदास, आशुतोष गोवारीकर, कुंदा ठाकरे (राज मातोश्री), राज ठाकरे, बाळा नांदगावकर, शर्मिला ठाकरे यांनी भेट दिली.
12 / 12
अजय-अतुल, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, अमिताभ बच्चन, संजय लीला भन्साली, आशिष शेलार, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे या दिग्गज व्यक्तींनी भेट दिली असून आणखी बड्या हस्ती दाखल होत आहेत.
टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरAmitabh Bachchanअमिताभ बच्चनRaj Thackerayराज ठाकरे