शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Chandrayaan 3 : भारताच्या चंद्रयानाने चंद्राचा पहिला फोटो पाठवला! तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 9:21 AM

1 / 9
ISRO चे चंद्रयान 3 ५ ऑगस्ट रोजी चंद्रायवर पोहोचले. आता चंद्रयान-3 चंद्राभोवती १७० किमी x ४३१३ किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत चंद्राभोवती १९०० किमी प्रति सेकंद या वेगाने फिरत आहे.
2 / 9
चंद्रयानातून काढलेले चंद्राची पहिले फोटो पाठवले आहेत. प्रत्येक फोटोत डाव्या बाजूला असलेले सोनेरी रंगाचे दिसणारे यंत्र चंद्रयानचे सोलर पॅनल आहे. चंद्राचा पृष्ठभाग आणि त्याचे खड्डे समोर दिसत आहेत. प्रत्येक फोटोत ते वाढत असल्याचे दिसत आहे.
3 / 9
९ ऑगस्ट रोजी दुपारी २.४५ च्या सुमारास त्याची कक्षा ४ ते ५ हजार किलोमीटरच्या कक्षेत बदलली जाईल. प्रत्येक फोटोसह चंद्र मोठा आणि गडद होईल.
4 / 9
१४ ऑगस्ट रोजी दुपारी यात घट करुन १००० किलोमीटर केले जाणार आहे. पाचव्या ऑर्बिट मॅन्युव्हरमध्ये, ते १०० किमीच्या कक्षेत ठेवले जाईल. १७ ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील.
5 / 9
१८ आणि २० ऑगस्ट रोजी डिऑर्बिटींग होईल. म्हणजेच चंद्राच्या कक्षेतील अंतर कमी होईल. लँडर मॉड्यूल १०० x ३५ किमीच्या कक्षेत जाईल. यानंतर २३ रोजी संध्याकाळी ५.४७ वाजता चंद्रयानचे लँडिंग केले जाईल.
6 / 9
चंद्राची कक्षा पकडण्यासाठी चंद्रयान-3 चा वेग ताशी ३६०० किलोमीटर इतका वाढवण्यात आला. कारण चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा सहापट कमी आहे. जर जास्त वेग असता तर चंद्रयानाने तो पार केला असता.
7 / 9
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चंद्रयानचा वेग २ किंवा १ किलोमीटर प्रति सेकंद कमी केला. या वेगामुळे तो चंद्राची कक्षा पकडू शकला. आता हळूहळू चंद्राभोवतीच्या त्याच्या कक्षेतील अंतर कमी करून ते दक्षिण ध्रुवाजवळ उतरवले जाईल.
8 / 9
चंद्रयान-3 यापूर्वी ट्रान्स लूनर ट्रॅजेक्टोरीमध्ये २८८ x ३६९३२८ किलोमीटर अंतरावर प्रवास करत होता. जर तो चंद्राची कक्षा पकडू शकला नसता तर २३० तासांनंतर तो पृथ्वीच्या पाचव्या श्रेणीच्या कक्षेत परत आला असता. इस्रोला पुन्हा चंद्रावर पाठवण्याचा दुसरा प्रयत्न करता आला असता.
9 / 9
ज्या कोणत्या देशांनी किंवा अवकाश संस्थांनी त्यांच्या रॉकेटद्वारे थेट चंद्राच्या दिशेने अंतराळयान पाठवले. त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तीनपैकी एक मोहीम अयशस्वी झाली. पण इस्रोने जो मार्ग आणि पद्धत निवडली आहे, त्यात अपयश येण्याची शक्यता फारच कमी आहे. आता पुन्हा मिशन पूर्ण करण्याची संधी आहे.
टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रो