Learning to drive a car? Then remember these five things, avoid fines and stay safe
Car Driving Tips: कार चालवायला शिकताय? मग या पाच गोष्टी लक्षात ठेवा, फाईन टाळा अन सुरक्षितही राहा By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 6:52 PM1 / 6कार चालवणे ही काही लोकांसाठी अगदी सामान्य बाबत असते. मात्र काही जणांसाठी कार चालवायला शिकणे खूप कष्टप्रद ठरते. कार चालवण्यासोबत तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागतं. तुम्ही कार चालवायला शिकत असाल तर खालील पाच नियमांचं अवश्य पालन करा. म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग करताना सुरक्षित राहाल. तसेच तुमच्यावर कुठलीही दंडात्मक कारवाईही होणार नाही. 2 / 6एका आकड्यानुसार मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे भारतात दररोज १९ जणांचा मृत्यू होतो. मद्यपान करून गाडी चालवल्यास २ हजारांपासून १० हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. त्याशिवाय ७ महिन्यांपासून चार वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. त्यामुळे मद्यपान करून कार चालवू नका. 3 / 6जर तुम्ही नव्याने कार ड्रायव्हिंग शिकत असाल तर सिटबेल्ट बांधण्याची सवय अवश्य करून घ्या. सिटबेल्ट लावल्याने तुम्ही ट्रॅफिकच्या फाईनपासून वाचाल. त्याबरोबरच अपघाताच्या परिस्थितीत तुमचे प्राणही वाचतील. सिटबेल्ट न लावता कार चालवल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. 4 / 6मोटार वाहन नियमानुसार कार चालवताना ड्रायव्हर केवळ नेव्हिगेशन टूल म्हणूनच फोनचा वापर करू शकतात. मात्र तुम्ही ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. या निमयाचे उल्लंघन केल्यास ५ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.5 / 6एका रिपोर्टनुसार २०१८ मध्ये भारतीय रस्त्यांवरील ६६ टक्के अपघात हे अतिवेगामुळे झाले होते. वेगासाठी होणारा दंड हा तुमच्या वाहनाच्या आकारानुसार वेगवेगळा असतो. सर्वसाधारणपणे एक हजार रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. 6 / 6अनेकजण घाईमध्ये रेड लाईटवर न थांबता पुढे निघून जातात. मात्र असे केल्यास ५ हजार रुपयांपर्यंत दंड आणि एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. हे दुर्घटनेचे कारणही ठरू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications