झंडा उँचा रहे हमारा... गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिरंग्याला मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 09:37 IST
1 / 16भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही दिल्लीत ध्वजारोहन करत तिरंग्याला सलामी दिली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिरंग्याला मानवंदना देण्यात येत आहे.2 / 16प्रजासत्ताक दिनी आणि स्वतंत्र दिनी शाळेतील मुलांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतो,3 वर्षीय आयुक्तने प्रजासत्ताक दिनाच्या शाळेतील रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेशात सादरीकरण केले. तिरंगा ध्वजाला मानवंदना देत देशाप्रती प्रेम व्यक्त केलं3 / 16लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही तिरंग्याला सलामी देत दिल्लीत ध्वजारोहन केलं.4 / 16गणतंत्र दिनाच्या काही दिवसांपासूनच देशात देशभक्तीचं वातवारण असतं, गरिबांपासून ते पंतप्रधानांपर्यंत हा देशभक्तीचा चढलेला साज सर्वत पाहायला मिळतो. 5 / 16प्रत्येक जण देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करत,जिथं असेल तिथं ध्वजानरोहन करतो. सैन्यातील जवानही यात अग्रस्थानी असतात6 / 16पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही तिरंगा रंगांच्या फुलात आरास केली आहे, मंदिर परिसरात देशभक्तीमय वातावरण पहायला मिळतंय. 7 / 16सॅँड आर्टीस्ट सुदर्शन पटनाईक यांनीही प्रजासत्ताक दिनी मनमोहन आणि कलाकृतीमय शुभेच्छा दिल्या आहेत. 8 / 16उत्तराखंड येथील ऋषिकेशच्या चंद्रेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाला तिंरंगा रंगातील फुलांनी सजविण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनी मंदिरातही देशभक्तीमय वातावरण दिसून आलं. 9 / 16गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत देशप्रेम होत असतं, सोशल मीडियातूनही टीम इंडियाच्या हातातील तिरंगा ध्वजाचे फोटो शेअर होत आहेत. 10 / 16सोशल मीडियातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना हटके फोटो शेअर करण्यात येत आहेत. दोन रुपयांच्या डॉलरवरली हे ध्वजारोहन भारी वाटतंय. 11 / 16गावागावात, जिल्हा परिषद शाळांतही ध्वजारोहन करुन तिरंग्याला सलामाी देण्यात येत आहे. 12 / 16दिल्लीत शेतकऱ्यांचे गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन सुरु असून आज ट्रॅक्टर रॅली काढण्यात येत आहे. या टॅक्टर रॅलीतही तिरंगा फडकल्याचं दिसून येतंय. 13 / 16इंडो तिटेबटीयन बॉर्डरवरही भारतीय सैन्याकडून बर्फाळ डोंगराव तिरंगा ध्वज फडकावून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय. 14 / 16लडाखमधील अतिशय थंड प्रदेशातील सीमारेषेवर सैन्यातील जवानांनी तिरंगा फडकावला15 / 16मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा या निवासस्थानी ध्वजारोहन केले, यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनीही तिरंग्याला मानवंदना दिली16 / 16सोशल मीडियावरही प्रजासत्ताक दिनाचा ट्रेंड व्हायरल होत आहे, अनेक फोटो शेअर करत सर्वच जण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहे.