शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लष्करप्रमुख अन् नंतर सीडीएस जनरल पद भूषवलेले बिपीन रावत यांच्या कारकिर्दीबाबत जाणून घेऊया!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 5:27 PM

1 / 9
भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. १४ जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे एमआय-१७व्ही५ हेलिकॉप्टर कोसळले. या याअपघातात १३ जण मृत्युमुखी पडले. विषेश म्हणजे जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या कारकिर्दीबाबत अधिक माहिती जाणून घेऊया!
2 / 9
भारताचे २६वे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या रावत यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. उपमुख्याधिकारी होण्यापूर्वी ते पुण्यातील सदर्न कमांडचे GOC इन कमांड होते.
3 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा केली होती. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) हे नवे पद तयार करण्याची ती घोषणा होती. त्यानंतर कॅबिनेटने सीडीएस पद बनविण्यासाठी मंजुरी दिली. माजी लष्कर प्रमुख झालेल्या बिपीन रावतांना या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रावत हे तिन्ही संरक्षण दलांचे सीडीएस जनरल बनले होते.
4 / 9
लष्करी सेवा बजावताना अनेक मोठ्या आव्हानांचा त्यांनी जिगरबाजपणे लढा जिंकला आहे. उत्तरेकडे लष्कराची फेरबांधणी करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे.
5 / 9
बिपीन रावत यांना अशांतता असलेल्या प्रदेशांमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. गेल्या ३० वर्षांत भारतीय लष्करातील विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठवला.
6 / 9
पाकिस्तानला लागून असलेली नियंत्रण रेषा, भारत-चीन सीमा व ईशान्येकडील राज्यांत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.अत्यंत समतोल पद्धतीनं सैन्याचं संचालन करणं, सुरक्षाविषयक मोहिमा आखून त्या यशस्वीरित्या पार पाडणं व नागरिकांशी सहज संवाद साधण्यात रावत यांचा हातखंडा होता.
7 / 9
लेफ्टनंट जनरल रावत डिसेंबर १९७८ मध्ये सैन्यात दाखल झाले. '११ गोरखा रायफल्स'च्या पाचव्या तुकडीतून त्यांनी लष्करी सेवेला सुरुवात केली होती.१९८६ मध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्यांनी पायदळाची धुरा संभाळली.
8 / 9
रावत यांनी राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर खोऱ्यात लष्करी तुकडीचं नेतृत्व केलं होतं. भारतीय लष्करात ब्रिगेडपदी असताना रावत यांनी काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेच्या बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्व केले.
9 / 9
भारताचे २६वे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या रावत यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. उपमुख्याधिकारी होण्यापूर्वी ते पुण्यातील सदर्न कमांडचे GOC इन कमांड होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा केली होती. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) हे नवे पद तयार करण्याची ती घोषणा होती. त्यानंतर कॅबिनेटने सीडीएस पद बनविण्यासाठी मंजुरी दिली. माजी लष्कर प्रमुख झालेल्या बिपीन रावतांना या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रावत हे तिन्ही संरक्षण दलांचे सीडीएस जनरल बनले होते. लष्करी सेवा बजावताना अनेक मोठ्या आव्हानांचा त्यांनी जिगरबाजपणे लढा जिंकला आहे. उत्तरेकडे लष्कराची फेरबांधणी करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे. वाढता दहशतवाद, छुपे युद्ध आणि ईशान्येतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. बिपीन रावत यांना अशांतता असलेल्या प्रदेशांमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. गेल्या ३० वर्षांत भारतीय लष्करातील विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठवला. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या वतीनं रावत यांनी अनेक मोठ्या लष्करी मोहिमांचे नेतृत्व केलं आहे. पाकिस्तानला लागून असलेली नियंत्रण रेषा, भारत-चीन सीमा व ईशान्येकडील राज्यांत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.अत्यंत समतोल पद्धतीनं सैन्याचं संचालन करणं, सुरक्षाविषयक मोहिमा आखून त्या यशस्वीरित्या पार पाडणं व नागरिकांशी सहज संवाद साधण्यात रावत यांचा हातखंडा होता. लेफ्टनंट जनरल रावत डिसेंबर १९७८ मध्ये सैन्यात दाखल झाले. '११ गोरखा रायफल्स'च्या पाचव्या तुकडीतून त्यांनी लष्करी सेवेला सुरुवात केली होती.१९८६ मध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्यांनी पायदळाची धुरा संभाळली. रावत यांनी राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर खोऱ्यात लष्करी तुकडीचं नेतृत्व केलं होतं. भारतीय लष्करात ब्रिगेडपदी असताना रावत यांनी काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेच्या बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्व केले. आहे गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. आता तर कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे (Omicron) चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत ( Bipin Rawat) यांनी मंगळवारी मोठा इशारा दिला आहे. या कोरोना महामारीचे जैविक युद्धात रूपांतर होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्व देशांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, असे बिपिन रावत यांनी म्हटलं होतं .
टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतDefenceसंरक्षण विभाग