शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बॅंकेच्या लॉकरमध्ये पाच वर्षांपूर्वी ठेवले होते सोने, जेव्हा मालकाने ते उघडलं तेव्हा पाहून तो उडालाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 11:31 AM

1 / 14
बऱ्याचदा दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेच्या लॉकरचा वापर केला जातो. बँकेच्या लॉकरमध्ये सोनंही सुरक्षित राहतं.
2 / 14
पण जर आपण सोने सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले असेल अन् ते काही वर्षांनी दगड बनल्याचं कधी ऐकिवात नसेल, पण राजस्थानमधील जलोर जिल्ह्यातही असेच एक प्रकरण समोर आले आहे
3 / 14
जिथे एका व्यक्तीने पाच वर्षांपूर्वी एका बँकेच्या लॉकरमध्ये आपले सोने ठेवले होते, पण जेव्हा लॉकर उघडला तेव्हा त्यामध्ये दगड मिळाले.
4 / 14
हे संपूर्ण प्रकरण राजस्थानच्या जलोर जिल्ह्यातील आहे. टिळक गेट येथील एसबीआय बँकेत एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले,
5 / 14
तेव्हा या बँकेत ठेवलेले सर्व सोन्याचे दगड रुपांतर झाल्याने जलोर शहरातील रहिवासी पारसमल जैन आश्चर्यचकित झाले.
6 / 14
पारसमल जैन यांचा महाराष्ट्रातील भिवंडी येथे व्यवसाय आहे. लॉकडाऊनमुळे ते 20 दिवसांपूर्वी जलोरला परतले. यानंतर त्यांनी बँकेत जाऊन त्यांचे लॉकर उघडले.
7 / 14
लॉकर उघडल्यावर पारसमल जैन यांना असा धक्का बसला की, ते आश्चर्यचकित झाले. त्या लॉकरमध्ये सोन्याऐवजी त्यांना दगड मिळाले.
8 / 14
पारसमल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार त्यांनी सुमारे 800 ग्रॅम सोन्याचे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. पण आता त्यात दागिन्यांऐवजी संगमरवरी दगडाचे तुकडे सापडले आहेत. या प्रकारानंतर बँक प्रशासनातही खळबळ उडाली आहे.
9 / 14
पारसमल यांनी पहिल्यांदा बँकेचे व्यवस्थापक राम दीन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्वरित प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी बँकेच्या इतर अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
10 / 14
अखेर त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण घटना सांगितली व गुन्हा दाखल केला. जेव्हा हे प्रकरण चिघळले, तेव्हा बँक व्यवस्थापकाने सांगितले की, जेव्हा आमच्या चेंबरमधून जेव्हा लॉकर ऑपरेट झाले, त्यावेळी योग्य पद्धतीनं त्यांची सही इ. बाबींची खातरजमा केली होती.
11 / 14
ते म्हणाले की, सर्व प्रक्रियेनंतर बॅंकेचा अधिकारी लॉकर उघडण्यासाठी गेला आणि लॉकरसुद्धा बरोबर होते. हे लॉकर ग्राहकांच्या वतीने हाताळण्यात आले होते.
12 / 14
मॅनेजर म्हणाला की, जेव्हा तो चेंबरमध्ये बसला होता, तेव्हा त्यांनी फक्त दगड मिळवण्याविषयी सांगितले. लॉकरची चावी ग्राहकाकडे असते, ग्राहक सोडून इतर कोणीही लॉकर उघडू शकत नाही. बँकेकडे फक्त मास्टर की असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
13 / 14
दुसरीकडे कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी बाग सिंह म्हणाले की, तक्रारीनुसार पारसमलने पाच वर्षांपूर्वी लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. ज्यात आता दगड सापडले आहेत. दिलेल्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
14 / 14
जेव्हा लॉकरमध्ये सोनं ठेवलं होतं, मग ते दगड कसे बनले. मध्यभागी लॉकर उघडलेले नसल्याचे बँक अधिकारी सांगत आहेत, तर ग्राहकांनी तक्रार दिली. आजूबाजूच्या भागात या प्रकरणाची बरीच चर्चा होत आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता पाहून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGoldसोनं