शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाजपाच्या या उमेदवाराच्या अंगात होतो देवीचा संचार, असा देतात भाविकांना आशीर्वाद, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 4:34 PM

1 / 6
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आतापर्यंत २५० हून अधिक उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. या उमेदवारी यादीमध्ये छत्तीसगडमधील काही उमेदवारांचाही समावेश आहे. दरम्यान, छत्तीसगडमधील कांकेर लोकसभा मतदारसंघात भाजपानं भोजराज नाग यांना उमेदवारी दिली आहे. भोजराज नाग यांचं वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक परंपरेनुसार त्यांच्या अंगात देवीचा संचार होतो.
2 / 6
छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सध्या मडई जत्रा सुरू आहेत. या जत्रांमध्ये बस्तरमधील स्थानिक देवी-देवता आपापल्या क्षेत्रात सहभागी होत असतात. अशीच एक जत्रा आमगावमध्ये भरली आहे. या जत्रेमध्ये भाजपाचे लोकसभेचे उमेदवार भोजराज नाग हे सुद्धा आपल्या देवी देवतांसोबत उपस्थित होते. आता भाजपाचे लोकसभेचे उमेदवार भोजराज नाग यांच्यावर देवीचा संचार होतो, असं सांगण्यात येत आहे. यावेळी नाग यांनी बडे डोंगर येथील माता दंतेश्वरी माईचा आशीर्वाद घेतला. यानंतर त्यांनी जनसंपर्काला सुरुवात केली.
3 / 6
येथे भोजराज नाग यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. त्यांनी सांगितले की, दंतेश्वरी माईचे पहारेकरी असलेले बाबा नरसिंहनाथ यांची एक देव जत्रा झाली. यामध्ये पुजाऱ्याच्या रूपात मी सहभागी झालो. मी येथे सर्व देवीदेवतांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी पुढे सांगितले की, बस्तरमधील पुजारी बैगा कशा प्रकारे काम करताता हे संपूर्ण जगाला समजावे म्हणून भाजपाने येथून पहिल्यांदा पुजारी बैगाला उमेदवार बनवलं आहे.
4 / 6
भाजपाने मला उमेदवार बनवले आहे. बस्तरमधील संस्कृती, रीती-रिवाज, वेशभूषा आणि परंपरा सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत, हे या माध्यमातून जगाला सांगितलं जाईल. मी एक पुजारी आहे. मी अनेक आघाड्यांवर लढाई लढली आहे. मी धर्मांतराविरोधातही लढलो आहे. मी जनतेसाठी सातत्याने लढत राहीन.
5 / 6
भोजराज नाग यांनी पुढे सांगितले की, मला मातेचा आशीर्वाद आहे. जर माझ्यावर कुठल्याही प्रकारची विघ्न बाधा आली तर आमच्या देवी देवता ते दूर करतील. तसेच ज्यांच्या अंगात देवीचा संचार होतो त्यांना सिरहा बैगा म्हटलं जातं. माझ्यावर देवीचा संचार होतो. त्यामुळे मलाही सिरहा बैगा या नावाने ओळखलं जातं, असेही त्यांनी सांगितले.
6 / 6
त्यांनी जनतेला मोदींची गॅरंटी आणि छत्तीसगड सरकारच्या आश्वासनांची माहिती दिली. बस्तरमधील आदिवासी कुठलंही काम करण्यापूर्वी देवी-देवतांची पूजा करून आशीर्वाद घेतात. भोजराज नाग यांनी अंतागडचे आमदार म्हणून काम पाहिले आहे. ते सिरहा बैगा आणि गुनिया संघाचंही नेतृत्वही करतात. बस्तरमधील ग्रामीण भागात देवी देवतांचे जत्रौत्सव करण्याची जुनी परंपरा आहे.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाChhattisgarhछत्तीसगड