शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाजपा जिंकलं की NDA?; ३३ वर्षापूर्वीही आला होता 'असाच' जनादेश; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 6:14 PM

1 / 10
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या निवडणूक निकालानं अनेकांना आश्चर्यचकीत केले आहे. निकालात आलेल्या जनादेशाने सर्वांचे अंदाज खोटे ठरवले. आतापर्यंतच्या निकालाचा कौल पाहता भाजपा २५० च्या वर जाताना दिसत नाही. सहकारी मित्रपक्षांच्या मदतीने भाजपा २९० चा आकडा गाठतेय. या जनादेशामागे अनेक प्रश्न दडले आहेत.
2 / 10
एनडीए ४०० पार आणि भाजपा ३७० पार जाईल ही भाजपाची रणनीती अयशस्वी ठरली. केवळ मोदींच्या चेहऱ्यावर भाजपाला यश मिळत नाही. त्यासाठी निवडून आलेले खासदार आणि राज्याचं नेतृत्वही चांगले लागते. आघाडीचं महत्त्व पुन्हा एकदा १० वर्षांनी अधोरेखित झालं आहे. भाजपाकडे स्वबळावर बहुमताचा आकडा नाही. ज्याच्या आधारे ते त्यांचा अजेंडा पुढे घेऊन जाऊ शकतील असं या जनादेशातून दिसतं.
3 / 10
१९९९ मध्ये १८२ जागा जिंकणाऱ्या भाजपाला जेव्हा २००४ मध्ये १३८ जागा मिळाल्या तेव्हा त्यांना सत्ता गमवावी लागली. त्यांच्याकडे १९९९ मध्येही बहुमत नव्हते आणि त्याआधीही नव्हते. २००४ मध्ये भाजपाहून अवघ्या ७ जागा अधिक मिळवत काँग्रेसनं १४५ जागांवर सरकार बनवलं होतं. २००९ मध्ये काँग्रेस १४५ हून २०६ जागांवर पोहचली होती.
4 / 10
भाजपाच्या अबकी बार ४०० पार घोषणा बुमरँग झाली. भाजपा सहजपणे निवडणूक जिंकेल असं वातावरण तयार झालं. त्यात भाजपाला मानणारे मतदारही उष्णतेमुळे मतदान केंद्राकडे फिरकले नाहीत. मतदानाची टक्केवारी न वाढल्यामुळे भाजपाला फटका बसला.
5 / 10
निकालाचा कौल पाहता यात भाजपाचा स्पष्ट विजय नाही तर एनडीएचा आहे. खासकरून जेडीयू आणि टीडीपी यांच्या भरवशावर भाजपाला अवलंबून राहावे लागणार आहे. हे दोन्ही पक्ष भाजपासोबत पूर्ण ५ वर्ष राहतील हे सांगणे कठीण आहे. नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे इतिहासात एनडीएपासून वेगळे झालेले आहेत.
6 / 10
भाजपाने २०१४ साली पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली. त्यावेळी स्वबळावर भाजपा २८२ जागांवर पोहचली. २०१९ ला भाजपाने ३०३ जागा जिंकल्या. मात्र यंदा भाजपाला २४० जागा जिंकणंही कठीण झालं आहे. त्यामुळे भाजपाचा हा मोठा पराभव असल्याचं बोललं जातं.
7 / 10
भाजपा भलेही देशात सरकार स्थापन करेल. परंतु त्यांचं सरकार जेडीयू आणि टीडीपी यांच्यासारख्या घटक पक्षांवर अवलंबून आहे. भाजपानं गेल्या १० वर्षात स्पष्ट बहुमतानं सरकार चालवलं. परंतु आता पुन्हा आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेत मोदींना सरकार चालवावं लागेल.
8 / 10
मनमोहन सिंह यांच्या काळात काँग्रेसनं कमी जागा निवडून आणूनही आघाडी सरकार चालवलं. वाजपेयी-आडवाणी यांनीही भाजपा बहुतांश १८२ जागा आणून सरकार चालवलं. भाजपाची २०२४ मध्ये त्यापेक्षा चांगली स्थिती आहे. हा जनादेश १९९१ सालच्या लोकसभा निवडणुकीसारखा आहे.
9 / 10
१९९१ मध्ये काँग्रेसनं २३२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान बनले. त्यांनी ५ वर्ष अन्य सहकारी पक्षांना सोबत घेत सरकार चालवलं. यावेळी भाजपाकडे २४० च्या आसपास जागा आहेत. आघाडी सरकार चालवणं त्यांचा मजबुरी आहे.
10 / 10
जर भाजपा सरकार बनलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅटट्रिक असेल. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ते दुसरे नेते असतील जे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील. १९५१-५२, १९५७, १९६२ मध्ये काँग्रेसनं निवडणूक जिंकली आणि नेहरू पंतप्रधान बनले होते.
टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी