शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोदी कोणाची साथ घेतायत? नायडूंनीच २०१८ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणलेला, नितीशकुमारांचा वाद तर एवढे की...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 7:37 PM

1 / 9
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल काल समोर आले आहे. एनडीएला देशात बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता सत्ता स्थापनेसाठी एनडीएच्या दिल्लीत हालचाली सुरू आहेत.
2 / 9
नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून पाच वर्षे सरकार चालवायचे असेल, तर त्यांना चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्या पाठिंब्याची गरज आहे. कारण २०१४ आणि २०१९ मध्ये स्वबळावर बहुमत आणणाऱ्या भाजपला यावेळी २७२ चा आकडा पार करता आलेला नाही.
3 / 9
५४३ जागांच्या लोकसभेत सरकारमध्ये राहण्यासाठी किमान २७२ जागा आवश्यक आहेत. यावेळी भाजपकडे फक्त २४० जागा आहेत. एनडीएकडे २९२ जागा आहेत, ज्या बहुमतापेक्षा २० जास्त आहेत. एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाचे १६ खासदार आहेत.
4 / 9
तिसऱ्या क्रमांकावर नितीश कुमार यांची जेडीयू आहे, त्यांच्याकडे १२ जागा आहेत. म्हणजेच नायडू आणि नितीश कुमार यांचे एकूण २८ खासदार आहेत. त्यामुळे एनडीए सरकार टिकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोघांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे.
5 / 9
आतापर्यंत टीडीपी आणि जेडीयू हे दोन्ही पक्ष एनडीएसोबत असल्याची चर्चा आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोघेही एनडीएच्या बैठकीला उपस्थित होते.एन चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांनी एनडीए सोडून आघाडीत सहभागी झाले होते.
6 / 9
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यातील संबंध अनेकवेळा बिघडले होते. मोदींच्या पाठिंब्यामुळे आपले मतदार नाराज होऊ शकतात, अशी भीती नितीश कुमार यांना होती. त्यामुळेच २००९ च्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी मोदींना बिहारमध्ये प्रचार करू दिला नाही. त्यानंतर २०१० च्या विधानसभा निवडणुकीतही नितीश कुमार यांनी मोदींना बिहारमध्ये प्रचार करू दिला नाही. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जून २०१० मध्ये पाटणा येथे होणार होती. यापूर्वी पाटणाच्या वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या, ज्यात नरेंद्र मोदी नितीश कुमार यांच्याशी हस्तांदोलन करताना दाखवण्यात आले होते. यामुळे नितीश इतके संतापले की त्यांनी भाजप नेत्यांसोबतचा कार्यक्रम रद्द केला होता. इतकेच नाही तर यानंतर नितीश कुमार यांनी गुजरात सरकारकडून कोसी पूर मदतीसाठी मिळालेला ५ कोटी रुपयांचा धनादेशही परत केला होता.
7 / 9
जून २०१३ मध्ये नितीश कुमार एनडीए सोबत सोडले. भाजप आणि जेडीयू १७ वर्षे एकत्र होते. आघाडीपासून वेगळे होण्याची घोषणा करताना नितीश कुमार म्हणाले होते की, आम्ही आमच्या मूलभूत तत्त्वांशी तडजोड करू शकत नाही. युती सोडण्यास भाग पाडले, असेही ते म्हणाले. नितीश कुमार यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक एकट्याने लढवली होती. यामुळे नितीश कुमार यांच्या जेडीयूचे मोठे नुकसान झाले. पराभवाची जबाबदारी घेत नितीश कुमार यांनी मे २०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी लालू यादव यांच्या राजदसोबत २०१५ ची विधानसभा निवडणूक लढवली.नितीश कुमार-लालू प्रसाद यादव जोडीने काम केले आणि बिहारमध्ये जेडीयू-आरजेडीचे सरकार स्थापन झाले. पण दोन वर्षांनंतर, जुलै २०१७ मध्ये नितीश कुमार यांनी पुनरागमन केले आणि पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले. एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी २०१९ च्या लोकसभा आणि २०२० च्या विधानसभा निवडणुका भाजपसोबत लढल्या. २०२० मध्ये, बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाले, पण नंतर ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी मार्ग बदलला आणि आरजेडीसोबत सरकार स्थापन केले.
8 / 9
नितीश कुमार यांच्याप्रमाणेच मोदी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यातील मैत्रीतही चढ-उतारांनी आहे. २०१८ पर्यंत नायडूंचा टीडीपी एनडीएचा भाग होता. एनडीएपासून वेगळे झाल्यानंतर नायडूंच्या टीडीपीने मार्च २०१८ मध्ये मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्तावही मांडला होता. मात्र, हा प्रस्ताव बाद झाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी आणि नायडू यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. युतीपासून फारकत घेतल्याने पीएम मोदींनी नायडूंना 'यूटर्न बाबू' म्हटले होते. एवढेच नाही तर २००२ च्या गुजरात दंगलीनंतर ज्या नेत्यांनी नरेंद्र मोदींकडून पहिल्यांदा राजीनामा मागितला, त्यापैकी नायडू एक होते. मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरात दंगलीमुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढला होता.
9 / 9
२०१९ च्या लोकसभा आणि आंध्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नायडू यांनी अनेकदा एनडीएमध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला होता. नायडूंनी कितीही विधाने केली तरी मोदींना टीडीपीला एनडीएमध्ये आणायचे नव्हते, असं बोलले जाते. पण अभिनेता बनलेले राजकारणी पवन कल्याण यांनी मोदी आणि नायडू यांना जवळ आणले. शेवटी, टीडीपी निवडणुकीपूर्वी मार्चमध्ये एनडीएमध्ये सामील झाली.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू