शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहुल गांधी नाही तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदींना कोण देऊ शकतं आव्हान? ममता, नितीश की केजरीवाल? सर्व्हेमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 12:16 PM

1 / 7
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. गेल्या बैठकीत विरोधकांनी आपल्या आघाडीला 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस' (इंडिया) असे नाव दिले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक 'एनडीए' विरोधात 'इंडिया' अशी होणार आहे.
2 / 7
दरम्यान, पुढील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशिवाय कोण तगडा उमेदवार असू शकतो, याची धक्कादायक माहिती एबीपी सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
3 / 7
बिहारमध्ये सलग दोनवेळा सत्तेवर राहिलेल्या नितीश कुमार यांचेही नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील आहे. पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची सुरुवातीपासूनच चर्चा आहे. सर्वेक्षणातही नितीश कुमार यांच्या नावावर बहुतांश लोकांनी सहमती दर्शवली आहे. राहुल गांधींशिवाय नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर तगडे उमेदवार असल्याचे १४ टक्के लोकांचे मत आहे.
4 / 7
दिल्लीची सत्ता सलग दोनदा जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाने (आप) पंजाबमध्येही दणदणीत विजय मिळवला. गुजरातमध्ये पहिल्यांदाच 'आप' निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि तेथेही काही जागा जिंकल्यानंतर पक्षाचा उत्साह वाढला आहे. यातच आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील झाले आहे. सर्वेक्षणात १४ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत ते नरेंद्र मोदींसमोर पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतात.
5 / 7
पश्‍चिम बंगालच्या सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आणि तगड्या नेत्या ममता बॅनर्जी या विरोधकांचाही एक तगडा चेहरा असून त्यांचे नावही पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे. अलीकडेच त्यांच्या पक्षातील एका खासदाराने उघडपणे त्यांचे नाव घेतले होते.
6 / 7
याशिवाय, सी-व्होटरने जून महिन्यात असेच सर्वेक्षण केले होते. त्यावेळी पंतप्रधानपदासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबतही जनतेकडून सवाल विचारण्यात आला होता. उत्तर प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता खूप जास्त आहे. सर्वेक्षणात ८ टक्के लोकांनी त्यांना पंतप्रधानपदासाठी पहिली पसंती असल्याचे सांगितले होते.
7 / 7
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ठोस आव्हान देण्याच्या प्रयत्नात २६ विरोधी पक्षांनी गेल्या आठवड्यात आघाडीचे नाव 'इंडिया' असे ठेवले. देशासमोर पर्यायी राजकीय, सामाजिक व आर्थिक अजेंडा मांडण्याचा संकल्प विरोधकांची बैठकीत व्यक्त केला. तसेच, विरोधी पक्षांनी आघाडीमध्ये एक समन्वयक आणि ११ सदस्यांची समन्वय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीNitish Kumarनितीश कुमारArvind Kejriwalअरविंद केजरीवाल