शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मतदार यादीत तुमचे नाव आहे का?; ही आहे ऑनलाइन प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 2:32 PM

1 / 8
आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही?, हे पाहणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. मतदार यादी तुम्ही घरबसल्याही तपासू शकता. मतदारयादीत तुमचे नाव असल्यास ऑनलाइनच मतदार सूचना पावतीची प्रिंट काढून घ्या. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाताना ही पावती आणि अन्य फोटो आयडी दाखवून मतदान करा.
2 / 8
फोन, कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या मदतीने www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या
3 / 8
वेबसाइटच्या डाव्या बाजूला तुम्हाला सर्चचा पर्याय दिसेल. तेथे आपले नाव टाइप करुन सर्च पर्यायावर क्लिक करा.
4 / 8
वेबसाइटवर तुम्हाला दोन टॅब दिसतील. एका टॅबमध्ये तुम्हाला आपल्या मतदार ओळखपत्रावरील तपशील म्हणजे नावासहीत अन्य माहिती टाइप करुन 'सर्च' ऑप्शनवर क्लिक करुन मिळवता येईल. दुसऱ्या टॅबमध्ये तुम्हाला व्होटर आयडी कार्डवरील EPIC No म्हणजे मतदार ओळखपत्रावरील क्रमांकाच्या आधारे आवश्यक ती माहिती मिळेल.
5 / 8
मतदार ओळखपत्रावरील क्रमांकाच्या मदतीने नाव सर्च करण्यासाठी त्यावरील क्रमांक आणि राज्याबाबतची माहिती तेथे देऊन 'सर्च' ऑप्शनवर क्लिक करावे.
6 / 8
यादीमध्ये तुमचे नाव दिसल्यास, व्ह्यू डीटेल्सवर क्लिक करा. येथे तुमच्या कार्डवरील आवश्यक सर्व माहिती बरोबर आहे की नाही? ते तपासून पाहा.
7 / 8
जर तुमच्याकडे EPIC No. उपलब्ध नसल्यास आपले नाव, वय, जन्मतारीख, राज्य आणि मतदारसंघाचा तपशील यासंदर्भातील माहिती येथे पोस्ट करुन यादीत नाव आहे की नाही, ते तपासून पाहा.
8 / 8
मॅपवर लोकेशन सेट करुनही मतदार यादीत तुम्ही आपले नाव शोधू शकता.
टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९