शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 1:19 PM

1 / 8
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडले, आता ४ जून रोजी निकाल येणार आहेत. या आधी काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. दरम्यान, डीबी लाइव्हच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला मोठा फटका बसताना दिसत असून, पक्षाची सत्ता गमावताना दिसत आहे.
2 / 8
लोकसभेचे निकाल ४ जून रोजी येणार आहेत. या आधी काल आलेल्या अनेक एक्झिट पोलने एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचे अंदाज दिले आहेत.पण, यूट्यूब चॅनल डीबी लाइव्हच्या एक्झिट पोलमध्ये, इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. चॅनलने आपल्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीला ३२-३४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
3 / 8
डीबी लाइव्हच्या एक्झिट पोलनुसार एनडीए सत्ता गमावू शकते असा दावा केला आहे. तर इंडिया आघाडी २६०-२९० जागांसह सरकार बनवताना दिसत आहे. या एक्झिट पोलमध्ये इतरांना २८-४८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
4 / 8
या एक्झिट पोलमध्ये देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एनडीए सर्वात मोठा पक्ष असल्याचे दिसत आहे. दरम्यान, २०१९ च्या तुलनेत इंडिया आघाडीला मोठी आघाडी मिळत असल्याचे दाखवले आहे.
5 / 8
एक्झिट पोलमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीला ३२-३४ जागा मिळतील, तर एनडीएला ४६-४८ जागा मिळतील. तर बसपाचे खातेही उघडणार नाही, असं दाखवले आहे.
6 / 8
या एक्झिट पोलमध्ये सीएम ममता बॅनर्जींच्या टीएमसी पक्षाला पश्चिम बंगालमध्ये मोठी आघाडी दाखवली आहे. एक्झिट पोलमध्ये ४० राज्यांतील टीएमसीला २६-२८ तर भाजपला ११-१३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
7 / 8
राजधानी दिल्लीत एक्झिट पोलमध्ये आप आणि काँग्रेसच्या युतीला मोठी आघाडी मिळणार असल्याचे दिसत आहे. दिल्लीत इंडिया आघाडीला ३-५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एनडीएला २ ते ४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
8 / 8
डीबी लाइव्हच्या एक्झिट पोलनुसार, बिहारमध्ये एनडीएला फक्त १४-१६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इंडिया आघाडीला जास्तीत जास्त २४-२६ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर एनडीए कर्नाटकात ८-१० जागांपर्यंत मर्यादित असल्याचा अंदाज आहे. इंडिया आघाडीला १८-२० जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी