Lok Sabha Election going to vote first time know all the process
Lok Sabha Election 2019 : पहिल्यांदा मतदान करत आहात? मग 'हे' लक्षात ठेवा! By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 12:30 PM1 / 8लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत.2 / 817 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत. 3 / 8निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट देऊन तुमचे मतदान केंद्र नेमके कोणते आहे, हे पाहू शकता. तिथे सीईओ, डीईओ, ईआरओ आणि बीएलओंना संपर्क करण्यासाठी त्यांचे फोन नंबर मिळू शकतात. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्येही मतदान केंद्राची माहिती मिळू शकते. 4 / 8मतदान केंद्रावर गेल्यानंतर केंद्राबाहेर तुम्हाला विविध पक्षांचे वेगवेगळे डेस्क आढळतील. कोणत्याही डेस्कवर तुम्ही तुमचे मतदार यादीतील नाव तपासू शकता. नाव पाहिल्यानंतर आत जा आणि रांगेत उभे राहा. 5 / 8तुमचा नंबर आल्यानंतर तुम्ही तुमचे आणि तुमच्या वडिलांचे नाव सांगा. त्यानंतर तेथील कर्मचारी तुमच्या बोटाला शाई लावेल. 6 / 8मतदानाच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर तेथे ईव्हीएम दिसेल. ज्या उमेदवाराला मत द्यायचे आहे, त्या उमेदवाराच्या नावापुढील बटन दाबा.7 / 8बटन दाबल्यानंतर लगेच पुढे जाऊ नका. व्हीव्हीपॅटची वाट पाहा. व्हीव्हीपॅटमधून आलेली स्लीप पाहा. तुमचे मत योग्य उमेदवाराला गेले का, याची खात्री करा. 8 / 8निवडणूक आयोगाने दिलेली मतदार स्लीप घेऊन मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. जर मतदार स्लीप मिळालेली नसेल, तर तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र किंवा मग सरकारने वितरित केलेले इतर कोणतेही ओळखपत्र सोबत नेऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications