"मी अभिनेत्री नाही तर तुमची मुलगी", कंगना यांची काँग्रेसवर सडकून टीका; ठाकरेंवरही निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 19:15 IST
1 / 10बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या मंडी येथील उमेदवार कंगना रणौत यांनी बुधवारी राजस्थानमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले.2 / 10राजस्थानच्या १३ लोकसभा जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होत आहे. बुधवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या.3 / 10कंगना ह्या हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून लोकसभेच्या रिंगणात आहेत. कंगना यांची प्रसिद्धी पाहता पक्षाकडून त्यांचा वापर इतरत्र प्रचार करण्यासाठी केला जात आहे. 4 / 10बुधवारी भाजप नेत्या कंगना राणौत यांनी जोधपूरमध्ये रोड शो केला. यावेळी भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. भाजपने जोधपूर येथून केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावर यांना मैदानात उतरवले आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या करणसिंह उचियारडा यांच्याशी आहे. 5 / 10जोधपूरमध्ये कंगना म्हणाल्या की, क्षत्रिय आणि राजपूत समाज कुठेही असला तरी त्यांची मुळे राजस्थानमध्येच आहेत. 6 / 10जेव्हा काँग्रेसच्या विषारी आघाडी सरकारने मला आव्हान दिले, माझ्या चारित्र्यावर बोट दाखवले तेव्हा या क्षत्रियांच्या रक्तामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील सरकार कोसळले. त्यांना खुर्चीवरून खाली उतरावे लागले. ज्या लोकांनी माझे घर तोडले त्यांची घमंड मोडली आहे, अशी टीका कंगना यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर केली. 7 / 10काँग्रेसचे लोक आपल्या जवानांच्या शौर्याकडे बोट दाखवतात आणि लष्कराचा अपमान करतात, असा आरोपही कंगना यांनी केला. 8 / 10सर्वसामान्यांना आवाहन करताना कंगना म्हणाल्या की, तुम्ही सर्वांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान करून विजयी करा. आपल्या महिला शक्ती आणि सैन्याचा विचार करून मतदान करा. 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम' अशा घोषणा देत कंगना यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.9 / 10याशिवाय तुम्ही मला अभिनेत्री म्हणून पाहू नका, मला तुमची बहीण आणि मुलगी म्हणून पाहा, असे देखील कंगना यांनी नमूद केले. 10 / 10याशिवाय तुम्ही मला अभिनेत्री म्हणून पाहू नका, मला तुमची बहीण आणि मुलगी म्हणून पाहा, असे देखील कंगना यांनी नमूद केले.