Lok Sabha elections 2024 How much does it cost per voter data provided by the Election Commission
लोकसभा: एका मतदारामागे किती खर्च येतो? निवडणूक आयोगाने सांगितली आकडेवारी By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 10:18 AM1 / 9१९५२ साली देशात लोकसभेची पहिली निवडणूक झाली, तेव्हा १७.३० कोटी मतदार होते आणि निवडणूक आयोगाचा एकूण खर्च होता १० कोटी ४० लाख रुपये. 2 / 9म्हणजे प्रत्येक मतदारामागे साधारण साठ पैसे. २०१४ साली ८३ कोटी ४० लाख मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ३८७० कोटी रुपये खर्च केले. म्हणजे प्रत्येक मतदारामागे ४६ रुपये ४० पैसे.3 / 9एकूणच काळाच्या ओघात प्रत्येक मतदारामागे निवडणूक खर्चात तब्बल ७५ पटींनी वाढ झाली. 4 / 9२०१९ च्या निवडणुकीचा एकूण खर्च निवडणूक आयोगाने जाहीर केलेला नाही, यात राजकीय पक्षांच्या खर्चाचा समावेश नाही. 5 / 9१९५२ - ६० पैसे, १९५७ - ३० पैसे, १९६२ - ३० पैसे, १९६७ - ४० पैसे, १९७१-१९७७ - ७० पैसे, १९८० - १.५० रूपये, १९८४-८५ - २ रूपये.6 / 9१९८९ - मतदानासाठी वयाची पात्रता २१ वर्षावरून १८ वर्षे करण्यात आली. यावेळी एका मतदारामागे ३.१० रूपये एवढा खर्च झाला.7 / 9१९९१-९२ - ७ रूपये, १९९६ - १०.१० रूपये, १९९८ - ११ रूपये, १९९९ - १५.३० रूपये, २००४ - १५.१० रूपये, २००९ - १५.५० रूपये, २०१४ - ४६.४० रूपये (एकूण खर्च ३,८७० कोटी, एकूण मतदार ८३.४ कोटी)8 / 9देशाच्या पहिल्या निवडणुकीत एका मतदारामागे झालेल्या खर्चाच्या तुलनेत ७५ पटीने वाढ झाल्याचे दिसते. 9 / 9संदर्भ : निवडणूक आयोग आणि फिनशॉट्स आणखी वाचा Subscribe to Notifications