मनोज तिवारींना आव्हान देणार कन्हैया कुमार; घर, कार, 'अशी' आहे मालमत्ता, दोघांत श्रीमंत कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 13:08 IST
1 / 11काँग्रेसने कन्हैया कुमार यांना ईशान्य दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी यांना ते आव्हान देणार आहेत. मनोज तिवारी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला होता.2 / 11कन्हैया कुमार यांना बिहारच्या बेगुसराय मतदारसंघातून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार या दोघांकडे नेमकी किती प्रॉपर्टी आहे, एकूण संपत्ती किती? दोघांमध्ये श्रीमंत कोण? हे जाणून घेऊया...3 / 112019 मध्ये बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या कन्हैया कुमार यांनी तेव्हा प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती 5,57,848 रुपये असल्याचे जाहीर केले होते. त्यात 3,57,848 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 2,00,000 रुपयांची स्थावर मालमत्ता होती. 4 / 11कन्हैया कुमार यांनी तेव्हा सांगितलं होतं की, त्याच्या उत्पन्नाचे स्रोत फ्रीलान्स रायटिंग, गेस्ट लेक्चर आणि पुस्तकांच्या रॉयल्टीतून मिळालेली रक्कम आहे.5 / 11कन्हैया कुमार यांच्या नावावर ना कोणती आलिशान कार होती ना कोणत्याही प्रकारचे दागिने. बिहारमध्ये त्यांच्या नावावर वडिलोपार्जित मालमत्ता होती. 6 / 11कन्हैया यांनी या जमिनीची किंमत 2,00,000 रुपये दिली होती. कन्हैया कुमार यांचे वडील शेतकरी आहेत, तर आई अंगणवाडीत काम करते.7 / 112019 मध्ये ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढवताना मनोज तिवारी यांनी निवडणूक शपथपत्रात आपली एकूण संपत्ती 24,28,17,031 रुपये असल्याचं जाहीर केलं होतं. 8 / 11तिवारी यांच्यावर 1,36,18,755 रुपयांचे कर्ज होते. मनोज तिवारी यांच्याकडे 8,64,11,031 रुपयांची जंगम मालमत्ता होती, तर त्यांच्याकडे 15,76,56,000 रुपयांची स्थावर मालमत्ता होती.9 / 11निवडणूक प्रतिज्ञापत्रात मनोज तिवारी यांनी अभिनय, जाहिरात आणि मॉडेलिंगमधून मिळणाऱ्या कमाईचा उल्लेख केला होता. मनोज तिवारी यांच्याकडे बिहारच्या कैमूरमध्ये एकूण तीन शेतजमिनी होत्या.10 / 11मुंबई, दिल्ली आणि बनारसमध्येही त्यांची निवासी मालमत्ता होती. मनोज तिवारी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे एकूण 5 कार आहेत. ज्याची किंमत तेव्हा (2019 मध्ये) 54 लाख रुपयांपेक्षा जास्त होती. 11 / 11यामध्ये Audi Q7, Mercedes-Benz, Fortuner, Honda City आणि Innova यांचा समावेश आहे. भाजपा नेते मनोज तिवारी यांच्याकडेही 134 ग्रॅम सोन्याचे दागिने होते.