शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहुल गांधी, ओवेसी ते महुआ मोइत्रांपर्यंत...; निवडणुकीनं केली सर्वांचीच चांदी! जाणून घ्या कुणाला मिळाला सर्वाधिक पैसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:50 PM

1 / 13
लोकसभा निवडणूक 2024 ने काँग्रेस खासदार राहुल गांधी, एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी ते टीएमसीच्या महुआ मोइत्रांची चांदी केली आहे. कारण या दिग्गज नेत्यांना निवडणूक लढवण्यासाठी लोखो रुपये देण्यात आले होते. तर जाणून घेऊयात कोणत्या पक्षाकडून कुणाला सर्वाधिक पैसा देण्यात आला.
2 / 13
सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांवर कोणत्या पक्षाने किती खर्च केला? याची माहिती पक्षांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.
3 / 13
जानेवारी 2022 मध्ये ECI च्या शिफारशीनुसार, केंद्राने सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांसाठी निवडणुक खर्चाची मर्यादा 70 लाख वरून वाढवून 95 लाख एवढी केली होती.
4 / 13
सरकारने लोकसभा निवडणुकीशीवय विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकरता ही रक्कम 28 लाख रुपयांवरून वाढवून 40 लाख रुपये करण्यात आली होती.
5 / 13
आता सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित खर्च मर्यादा मोठ्या राज्यांसाठी 90 लाख रुपये तर लहान राज्यांसाठी 75 लाख रुपये एवढी आहे.
6 / 13
अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ने दिल्लीतील दोन आणि गुजरातमधील एक अशा तीन उमेदवारांना एकूण 60 लाख रुपये दिले. पीटीआयच्या वृत्तानुसार, गुजरातमधील भरूचमधील आपचे चैतराभाई वसावा यांना 60 लाख रुपयांपैकी जवळपास निम्मी रक्कम मिळाली आहे.
7 / 13
लोकसभा निवडणुकीतील खर्चाच्या आकडेवारीवरून, AIMIM ने असदुद्दीन ओवेसी यांना दोन हप्त्यांमध्ये एकूण 52 लाख रुपये दिले आहेत.
8 / 13
टीएमसीने 7 जूनला निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या माहितीनुसार, पक्षाने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांवर 3.60 कोटी रुपये एवढा खर्च केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील TMC ने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 48 उमेदवारांना प्रत्येकी 75 लाख रुपये दिले आहेत.
9 / 13
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा सध्याचे लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनाही 75 लाख रुपये मिळाले आहेत.
10 / 13
बॉलिवूडमधून राजकारणात आलेले तसेच, दोन वेळा केंद्रीयमंत्री राहिलेले शत्रुघ्न सिन्हा (आसनसोलचे टीएमसी लोकसभा खासदार) यांनाही 75 लाख रुपये मिळाले आहेत.
11 / 13
ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील कृष्णनगर, पश्चिम बंगालच्या लोकसभा खासदार महुआ मोईत्रा यांनाही 75 लाख रुपये देण्यात आले आहेत.
12 / 13
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने राहुल गांधी यांना दोन वेगवेगळ्या जागांवरून निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येकी 70 लाख रुपये दिले होते.
13 / 13
राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले होते. मात्र, त्यांना वायनाडची जागा सोडावी लागली होती.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनRahul Gandhiराहुल गांधीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीElectionनिवडणूक 2024