Loksabha Election 2024: Rahul Gandhi and congress started Preparing for Loksabha Election 2024
Loksabha Election 2024: 2024च्या 'महायुद्धाची' तयारी; भाजपच्या पावलावर पाऊल, राहुल गांधी लागले कामाला... By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 4:26 PM1 / 8 Loksabha Election 2024 : 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतीच भाजपने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची पुनर्रचना केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीदेखील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. 2 / 8 मनमोहन सिंग सरकारविरोधात भाजपने ज्या रणनीतीचा अवलंब केला होता, त्याच रणनीतीवर राहुल गांधी काम करणार आहेत. ANI नुसार, लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून राहुल गांधी 22 ऑगस्ट रोजी सिव्हिल सोसायटीतील लोकांच्या भेटी घेणार आहेत. 3 / 8 राहुल गांधी विविध संघटनांचे प्रश्न ऐकून, त्यावर आपले म्हणणे मांडणार आहेत. राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यांच्या या यात्रेच्या उद्देशावर ते सिव्हिल सोसाटीशी चर्चा करतील. त्यांच्या दौऱ्यापूर्वी राहुल गांधी यांनी सिव्हिल सोसाटीतील लोकांशी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. 4 / 8 राहुल विविध विभागांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना भेटणार आहेत. या क्रमाने योगेंद्र यादव, मेधा पाटकर आणि इतर लोक आणि संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. याशिवाय 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेसाठी मोठ्या संख्येने लोकांशी संपर्क साधला जात आहे.5 / 8 विशेष म्हणजे 2014 पूर्वी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या बॅनरखाली अनेक संघटनांनी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण केले होते. तत्कालीन विरोधी पक्ष भाजपने यूपीए सरकारमधील भ्रष्टाचार आणि धोरणाचे मुद्दे उपस्थित करत एक मोठा विरोधी गट तयार केला होता. 6 / 8 हा तो काळ होता जेव्हा अखिल भारतीय चळवळ सुरू झाली होती. 2014 च्या निवडणुकीत दहा वर्षे राज्य करणारे यूपीए सरकार सत्तेबाहेर गेले. काँग्रेससह इतर मित्रपक्षांनाही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच धर्तीवर आता राहुल गांधी सामान्य जनतेला भेटून भाजप सरकारविरोधात मोर्चा उभा करणार आहेत. 7 / 8 राहुल गांधी त्यांच्या भाषणातून घटनात्मक संस्थांचा कथित गैरवापर, बेरोजगारी, समाजातील फूट, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अर्थव्यवस्थेची स्थिती, असे मुद्दे उपस्थित करतील. भारत जोडो यात्रेसाठी स्वतंत्र लोगो, वेबसाइट आणि साहित्यही तयार करण्यात आले आहे. दरम्यान, 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपनेही तयारी सुरू केली आहे. 8 / 8 आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये 40 पैकी 35 जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. 2024 मध्ये भाजप विक्रमी विजय मिळवेल, असे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी बुधवारी सांगितले. त्याच वेळी, पक्षाने आपल्या खासदारांना निवडणूक निकालांमध्ये ज्या भागात पक्ष दुसर्या किंवा तिसर्या क्रमांकावर आला होता, त्या बूथवर काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications