Look at the condition of 9 medical colleges inaugurated by PM Narendra Modi at Uttar Pradesh
Narendra Modi: कमालच झाली! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धाटन केलेल्या ९ मेडिकल कॉलेजची अवस्था पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 11:58 AM1 / 10आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेशात सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यूपीत सध्या भाजपाची सत्ता आहे. निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे भाजपा सरकारनं विकास कामाच्या उद्धाटनांचा धडाकाच लावला आहे. 2 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सिद्धार्थनगर येथून ९ मेडिकल कॉलेजचं उद्धाटन केले. सिद्धार्थनगरसह एटा, हरदोई, प्रतापगड, फतेहपूर, देवरिया, गाजीपूर, मिर्झापूर, जौनपूर याठिकाणीही मेडिकल कॉलेजचं बांधकाम करण्यात आलं आहे. याचंही उद्धाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं.3 / 10या सर्व मेडिकल कॉलेजमध्ये नॅशनल मेडिकल आयोगाच्या मानकानुसार ३०० बेड्स बनून तयार आहेत. अजूनही ५०० बेड्सचं काम सुरु आहे. परंतु या ९ मेडिकल कॉलेजपैकी ७ मेडिकल कॉलेजची पडताळणी करण्यात आली तेव्हा सत्य काही भलतंच असल्याचं दिसून आलं. आजतकनं याबाबत वृत्त दिलं.4 / 10माँ विंध्यवासनी स्वशासी राज्य मेडिकल महाविद्यालय या नावानं मिर्झापूर इथं मेडिकल कॉलेज उभारण्यात आलं आहे. याठिकाणी वीज २४ तास असणं गरजेचे आहे. परंतु अद्याप इथं वीजेचं काम अर्धवट राहिलं आहे. इमारत पूर्ण झाली आहे. २३२ कोटी खर्च करून ३० एकरात हे कॉलेज उभारलं आहे. 5 / 10२०६ कोटी खर्च करून बनवलेल्या या मेडिकल कॉलेजमध्ये ९० टक्के काम पूर्ण झालं आहे. फॅक्लटीज नियुक्ती करण्यात आली आहे. ज्युनिअरपासून सिनिअर पदं भरण्यात आली आहेत. याठिकाणी रुग्णांवर कॅम्पसपासून १० किमी अंतरावर असलेल्या जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातील. जिल्हा रुग्णालयात ९ मजल्याची इमारत आणि मेडिकल कॉलेज ओपीडी बांधकाम सुरु आहे. आतापर्यंत पहिला मजलाही बनला नाही.6 / 10५५४ कोटी खर्च करून उभारण्यात येत असलेल्या मेडिकल कॉलेजला आतापर्यंत ३०० कोटी मिळालेत. या मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले होते. २५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचंही उद्धाटन केले. परंतु या इमारतीचं काम अद्याप पूर्ण होणार असून त्याला जवळपास २-३ वर्ष लागण्याची शक्यता आहे. 7 / 10प्रतापगडमध्ये सोनेलाल पटेल नावाचं मेडिकल कॉलेज बनवलं जात आहे. त्याचं उद्धाटन झालं परंतु ही इमारत अद्यापही अर्धवट आहे. मुख्य रस्त्यापासून कॉलेजपर्यंत जाणारा रस्ताही बनला नाही. या इमारतीत ३४५ बेड्स असतील त्यात २० आयसीयू आहेत. लवकरच ओपीडी सुरु होईल असं आरोग्य मंत्री सांगत आहेत.8 / 10देवरिया येथे महर्षी देवराहा बाबा मेडिकल कॉलेजला जिल्हा रुग्णालयातून आरोग्य सुविधा सुरु केल्यात. नीटचा रिझल्ट आल्यानंतर याठिकाणी १०० प्रवेश दिले जातील आणि MBBS शिक्षणाला सुरुवात होईल. २०८ कोटी खर्च करून अद्याप इथं २० टक्के काम अर्धवट आहे. 9 / 10फतेहपूर जिल्ह्यातील अमर शहीद जोधा सिंह अटैया ठाकूर मेडिकल कॉलेजचं काम मार्च २०२१ मध्ये पूर्ण होणार होते. परंतु अद्याप ही इमारत पूर्णपणे बनली नाही. शहरापासून ८ किमी नॅशनल हायवेवरील अल्लीपूर गावात या मेडिकल कॉलेजचं बांधकाम केले. इमारतीत आत आणि बाहेर फिनिशिंगचं काम सुरुच आहे.10 / 10३०० बेड्सच्या या मेडिकल कॉलेजमध्ये जिल्हा रुग्णालयात १०० बेड ओपीडी सुरु केली आहे. परंतु इमारत पूर्ण बनली नाही. MBBS विद्यार्थ्यांचे लेक्चर रुम, रजिडेंट डॉक्टर, प्रोफेसर निवास बनवून झालं आहे. परंतु ट्रामा सेंटरचं काम अद्याप बाकी आहे. ही इमारत पूर्ण होण्यासाठी जुलै २०२२ पर्यंत वेळ लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications