शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LPG Prices: जगाच्या तुलनेत भारतात LPG गॅसची किंमत सर्वाधिक, पेट्रोलच्या बाबतीत कितवा नंबर..?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 10:10 PM

1 / 8
भारतातील महागाईत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरांनी अक्षरशः सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडलेय. अशा परिस्थितीत, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सध्या जगातील सर्वात महाग एलपीजी गॅस भारतात विकला जातोय. तर, पेट्रोलच्या बाबतीत आपला देश तिसरा आणि डिझेलच्या बाबतीत 8व्या स्थानावर आहे.
2 / 8
आपण भारतीय चलनाची पर्चेजिंग पॉवर पाहिली तर भारतात एलपीजीची प्रति किलोग्रॅम किंमत सर्वात जास्त आहे. पर्चेजिंग पॉवरच्या दृष्टीने एलपीजीची किंमत प्रति किलो 3.5 डॉलर आहे.
3 / 8
भारतीय नागरिकांच्या दैनंदिन उत्पन्नाचा 15.6 टक्के भाग या गॅसवर खर्च होतोय. इतर कोणत्याच देशातील नागरीक गॅसर इतका खर्च करत नाहीत.
4 / 8
पर्चेजिंग पॉवरच्या बाबतीत भारतानंतर तुर्की, फिजी, मेलडोव्हा आणि त्यानंतर युक्रेनचा क्रमांक लागतो. स्वित्झर्लंड, फ्रान्स, कॅनडा आणि यूकेमध्ये एलपीजी गॅसची किंमत लोकांच्या पर्चेजिंग पॉवरच्या तुलनेत खूपच कमी आहे.
5 / 8
याशिवाय, पर्चेजिंग पॉवर पॅरिटीनुसार भारतात 1 लिटर पेट्रोलची किंमत $1.5 च्या आसपास आहे. अमेरिकेत $1.5 च्या किमतीत फार कमी वस्तू विकत घेता येतात, कारण तेथील लोकांचे सरासरी उत्पन्न खूप जास्त आहे.
6 / 8
भारतात 120 रुपयांना अनेक वस्तू खरेदी करता येतात. दैनंदिन उत्पन्नापैकी 23.5 टक्के रक्कम प्रति लिटर पेट्रोल खरेदीवर खर्च होत आहे. भारताच्या पुढे दोन शेजारी देश आहेत.
7 / 8
नेपाळमध्ये रोजच्या कमाईपैकी 38.2 टक्के पेट्रोलवर खर्च करावा लागतो, तर पाकिस्तानमध्ये 23.8 टक्के पेट्रोल खरेदीवर खर्च होतो. त्याचप्रमाणे भारतात डिझेलच्या दरानेही 100 रुपये प्रतिलिटरचा टप्पा पार केला आहे.
8 / 8
अशा परिस्थितीत येथील दैनंदिन उत्पन्नापैकी 20.9% भाग डिझेलच्या खरेदीवर जातो. तर, नेपाळ 34 टक्के आणि पाकिस्तान 22.8 टक्के आहे. अशा रितीने सात देश भारताच्या पुढे आहेत.
टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल