तांत्रिक बिघाडामुळे पहिल्याच दिवशी लखनऊ मेट्रो ठप्प! By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 6:03 PM
1 / 4 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ मेट्रोचे उद्घाटन केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली. 2 / 4 मेट्रोच्या पहिल्याच फेरीच्यावेळी तांत्रिक बिघाड उद्भवला. त्यामुळे मेट्रोत १०० हून प्रवासी तासाभरापेक्षाही अधिक काळ अडकून पडले होते. त्यांना नंतर आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आलं. 3 / 4 केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी लखनऊ मेट्रोला हिरवा कंदील दाखवला. 4 / 4 ट्रान्सपोर्ट नगर ते चारबाग या दरम्यान साडेआठ किलोमीटर अंतरासाठी ही मेट्रो सुरु करण्यात आली असून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ही मेट्रो सुरु राहणार आहे. आणखी वाचा