Mahaparinirvan din : Quotes by B.R. Ambedkar that explain what real education and freedom mean
आजही आपल्याला जगणं कसं असावं हे शिकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार! By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 9:33 AM1 / 18भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ व्या महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचे विचार, त्यांचं देशाला घडवणारं कार्य या निमित्ताने नेहमीच चर्चेत येतं. त्यांच्या विचारांनी आजही लोकांना प्रेरणा मिळते. त्यामुळेच त्यांचे विचार पुन्हा पुन्हा या ना त्या निमित्ताने सोशल मीडियातही शेअर केले जातात. माणसाला माणसासारखं जगायला शिकवणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे असेच काही विचार...2 / 18मी अशा धर्माला मानतो जो धर्म, स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर3 / 18जर मला असं वाटलं की संविधानाचा दुरूपयोग केला जात आहे, तर मी ते सर्वात आधी मी जाळेन. – डॉ.बाबासाहेब आंबेडकर4 / 18जीवन लांब असण्यापेक्षा महान असावं. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर5 / 18आपण सर्वात आधी आणि सर्वात शेवटी भारतीय आहोत. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर6 / 18बुद्धीचा विकास हा मानव अस्तित्वाचं प्रथम लक्ष्य असलं पाहिजे. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर7 / 18जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणा अभावी जिवंतपणी दुस-याचा गुलाम होतो. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर8 / 18माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर9 / 18काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर10 / 18माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर11 / 18मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर12 / 18तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर13 / 18आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर14 / 18स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ! - डॉ.बाबासाहेब आंबेडकर15 / 18लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर16 / 18शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर17 / 18लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर18 / 18देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणखी वाचा Subscribe to Notifications