Maharashtra No. 1 in the country, vaccination of 1.5 crore citizens in the state
जय हो... देशात महाराष्ट्र नंबर 1, राज्यात 1.5 कोटी नागरिकांचं लसीकरण By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 2:17 PM1 / 12कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली आहे. त्यामुळे, देशात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे2 / 12राज्यात सोमवारी सायंकाळी सहापर्यंत दिवसभरात पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. 3 / 12राज्यात ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. 4 / 12त्यानंतर, राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.5 / 12लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आता राज्यात १.५ कोटी नागरिकांचे लसीकरण महाराष्ट्राने केले आहे. 6 / 12सोमवारीच राज्याने १ कोटी ४८ लाखांच्या आसपास लसीकरणाचा आकडा गाठला होता. उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले होते.7 / 12महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला असून देशाता सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. 8 / 12गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे असून आज २६ एप्रिल रोजी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ६१५५ लसीकरण केंद्र होते. 9 / 12त्यामध्ये ५३४७ शासकीय आणि ८०८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीले आहे. 10 / 12कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. 11 / 12लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.12 / 12राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications