'Maharashtra's Biodiversity Standards' on rajpath delhi in republic day
'महाराष्ट्राची जैवविविधता मानके', राजपथावर चित्ररथांनी वेधले लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 12:34 PM1 / 15देशभरात आज 73 वा प्रजासत्ताक दिन (republic day 2022) साजरा होत आहे. राजधानी दिल्लीतील राजपथावर दैपिप्यमान असे पथसंचलन पाहायला मिळाले. या पथसंचलनात महाराष्ट्रातील जैवविविधता मानके (republic day maharashtra chitrarath 2022) हा चित्ररथ साकारण्यात आला होता. 2 / 15राजपथावरील संचलनात सर्वच राज्यांतील चित्ररथांचे प्रदर्शन झाले, अनेक नाविण्यापूर्ण कलाकृती आणि ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या क्षणाचे चलचित्रही येथे लक्ष वेधक ठरले3 / 15महाराष्ट्रासह 12 राज्यांची आणि 7 मंत्रालयांची चित्ररथ सादर करण्यात आली. महाराष्ट्रातर्फे ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ आहे.4 / 15यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंची आणि 6 फूट रूंद पंखाची देखणी प्रतिकृती आहे. तसंच दीड फूट उंच दर्शविणारे राज्यफुल ‘ताम्हण’ याचे अनेक रंगीत गुच्छ दर्शविले आहेत. 5 / 15त्यावर इतर छोटी आकर्षंक फुलपाखरांची लोभस प्रतिकृती आहे. चित्ररथावर 15 फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी तसंच युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या ‘कास पठारा’ची प्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे.6 / 15चित्ररथाच्या दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ 3 फूट उंच दर्शविला आहे, त्यामागे राज्यपक्षी हरियाल,पिवळा कबुतराची प्रतिकृतीही दिसते. 7 / 15चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेला राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती आणि शेवटी राज्यवृक्ष ‘आंबा’ वृक्षाची प्रतिकृती सुमारे १४ ते १५ फूट उंचीचा आहे.8 / 15दुर्मिळ ‘माळढोक’ पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली ‘खेकड्या’ची तसंच, मासा प्रजाती वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती दिसत आहे. 9 / 15यासह सुंदर कलात्मक दृष्टिकोनातून जैवविविधता दिसेल असे देखावेही दर्शनीभागावर आहेत. यासोबतच राजपथावरून सरकणाऱ्या चित्ररथासोबत डावी व उजवीकडे दोन-दोन असे चार कलाकार नृत्य सादर करतील. 10 / 15यामध्ये महाराष्ट्राने गोंधळ ही लोककला सादर केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आला असून यावेळी महाराष्ट्राच्या लोककलेचे सादरीकरण करण्यात झाले आहे.11 / 15महाराष्ट्रासह, हरयाणा, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गुजरात, आसाम, गोवा या राज्यांनीही वेगवेगळ्या थीम साकारत आपला चित्ररथ राजपथावर सादर केला. 12 / 15गुजरातने गुजरातमधील आदिवासी बांधवाची कलाकृती सादर केली होती. 13 / 15गुजरातने गुजरातमधील आदिवासी बांधवाची कलाकृती सादर केली होती. 14 / 15आदिवासी नृत्याचा अविष्कार चित्ररथाच्या आणि मूर्तींच्या रुपाने पाहयला मिळाला15 / 15आदिवासी नृत्याचा अविष्कार चित्ररथाच्या आणि मूर्तींच्या रुपाने पाहयला मिळाला आणखी वाचा Subscribe to Notifications