Mahatma Gandhi Death Anniversary do you know these things about mahatma gandhi
Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 11:08 AM1 / 10महात्मा गांधींची आज 71वी पुण्यतिथी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत माहीत नसलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया.2 / 1030 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दिल्लीमधील बिर्ला भवन येथे हत्या करण्यात आली होती. 3 / 10गांधीजींनी 1899 मध्ये बोअर युद्धादरम्यान जखमी सैनिकांची सेवा केली. याच युद्धाची भीषणता पाहून त्यांनी 'अहिंसे'चा मार्ग स्वीकारला होता. 4 / 10गांधीजींमुळे चार महाद्विपं आणि 12 देशांमध्ये नागरिक हक्क चळवळ घडून आली. 5 / 10गांधीजींना अद्याप शांततेचं नोबेल मिळालेलं नाही, पण तब्बल पाच वेळा या सन्मानासाठी नामांकन मिळाले होते. 6 / 10ब्रिटननेही गांधीजींच्या निधनानंतर 21 वर्षांनी टपाल काढून त्यांचा गौरव केला होता.7 / 10भारतातील 53 आणि परदेशातील 48 प्रमुख मार्ग महात्मा गांधींच्या नावाने ओळखले जातात. 8 / 10गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये एकूण तीन फुटबॉल क्लब स्थापन करण्यास मदत केली होती. 9 / 10महात्मा गांधी त्यांच्या आयुष्यात तब्बल रोज 18 किमी चालले. एवढं अंतर पूर्ण जग फिरण्याच्या दुप्पट होते. 10 / 10स्वातंत्र्य साजरं करण्यासाठी झालेल्या पंडित नेहरुंच्या भाषणावेळी गांधीजी उपस्थित नव्हते. आणखी वाचा Subscribe to Notifications