Makar Sankranti Special Gujarat Harvest festival of Uttarayan was celebrated in the state
Makar Sankranti Special : काय पो छे! आकाशात रंगली पतंगबाजी By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 3:30 PM1 / 8नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून तिळगुळाने सर्वांचं तोंड गोड करतात. मोठ्या उत्साहात भारतात मकरसंक्रांत हा सण साजरा केला जातो.2 / 8गुजरातमध्ये 'उत्तरायण' म्हणजे मकरसंक्रांत धूमधडाक्यात साजरी केली जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी गुजरातमध्ये पतंग उडवली जाते.3 / 8पतंगबाजीत अनेकांच्या पतंग उडवण्याच्या कौशल्याचा कस लागतो. उत्तरायणाच्या दिवशी रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सुंदर दिसले. 4 / 8गुजरातमध्ये पतंग उडवण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. 5 / 8गुजरातमध्ये बरेच दिवस आधीच पतंगबाजी उत्सवाला सुरुवात होते. आकाशातील विविध आकाराचे आकर्षक पतंग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. 6 / 8अमित शहा यांनी मंगळवारी अहमदाबादमध्ये आयोजित 'उत्तरायण' कार्यक्रमात सहभाग घेतला होता.7 / 8अमित शहा यांना देखील पतंग उडविण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी देखील पतंग उडवली. 8 / 8गुजरातमध्ये अनेकांच्या घरात संक्रांतीच्या दिवशी उंधियो हा पदार्थ बनवला जातो. तसेच अनेकांच्या घरात जिलेबीची मेजवाणी असते. आणखी वाचा Subscribe to Notifications