Make a rainy picnic, visit these places in the country!
पावसाळी पिकनिक करायचीय, देशातील या ठिकाणांना नक्की भेट द्या! By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 5:00 PM1 / 6पावसाळ्यात कर्नाटकातील जॉग फॉल हा धबधबा पाहण्यासारखा असतो. शरावती नदीचं वाहत आलेलं पाणीच या धबधब्याला जाऊन मिळतं. 2 / 6केरळमधलं कोची, कोवलम, कोझिकोडे ही ठिकाणं नयनरम्य आहेत. निसर्गानं केरळला भरभरून सौंदर्य बहाल केलं आहे. 3 / 6पावसाळी वातावरणात खंडाळ्याचं सौंदर्य विलोभनीय भासतं. डोंगर द-यांतून कोसळणारे धबधबे लक्ष वेधून घेत असतात. 4 / 6मेघालयमधल्या शिलाँगला पूर्व स्कॉटलंड म्हणूनही ओळखलं जातं. इथे स्कॉटलंडसारख्या डोंगरद-यांमधून वाहणा-या नद्या सदोदित आपलंसं करतात. 5 / 6अरुणाचलमधील तवांगही पर्यटकांना नेहमीच खुणावतं. इथे तुम्ही मनमुराद फोटो काढू शकता. 6 / 6उत्तराखंडातही पावसाळ्यात नयनरम्य वातावरण असतं. पावसाळी वातावरणात हिरव्यागार फुलांनी उत्तराखंड बहरलेलं असतं. आणखी वाचा Subscribe to Notifications