By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 20:04 IST
1 / 5 केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज भेट झाली. 2 / 5दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही भेट झाली. या भेटीचे फोटो समोर आले आहेत. 3 / 5या भेटीदरम्यान उद्धव यांच्यासोबत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे देखील दिसत आहेत. सुत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार ही बैठक अर्धा तास सुरू होती. 4 / 5या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पण ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. 5 / 5केंद्रातील मोदी सरकारला विरोध या मुद्यावर हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.