Man alone in the universe... ISRO chief S. Somnath made a big claim about the existence of aliens
ब्रह्मांडात मानव एकटाच की..., ISROच्या प्रमुखांनी एलियनच्या अस्तित्वाबाबत केला मोठा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 2:19 PM1 / 5या ब्रह्मांडात मानव हा एकटाच आहे का? पृथ्वी सोडून अन्यत्र कुठे जीवन आहे का? असा प्रश्न सर्वांना नेहमीच पडत असतो. मागच्या बऱ्याच काळापासून खूप संशोधनानंतरही याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. तरीही एलियन्सच्या अस्तित्वाबाबत नवनवे दावे नेहमीच केले जातात. दरम्यान, इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनीही एलियन्स अर्थात परग्रहवासीयांबाबत महत्त्वाचा दावा केला आहे. 2 / 5एस. सोमनाथ यांच्या मते ब्रह्मांडामध्ये कुठे ना कुठे एलियन्सचं अस्तित्व निश्चितपणे आहे. ब्रह्मांडामध्ये एलियन्सच्या वसाहती अस्तित्वात आहेत. एलियन्सचं अस्तित्वाबाबतचं आपलं म्हणणं पटवण्यासाठी इस्रोच्या प्रमुखांनी तंत्रज्ञानामध्ये आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांबाबतचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, १०० वर्षांपूर्वीचं तंत्रज्ञान आज खूप जुनं वाटतं. सोमनाथ यांनी परग्रहवासीयांबाबत एक डबल एलियन सिव्हिलायझेशन नावाची थियरी सांगितली.3 / 5सोमनाथ यांनी सांगितले की, अशा संस्कृतींबाबत विचार करा, ज्यामधील एक आपल्यापेक्षा २०० वर्षांनी मागे आहे. तर दुसरी आपल्यापेक्षा १००० वर्षांनी पुढे आहे. ही शक्यता विकासाच्या टप्प्यामधील व्यापक परिघ दर्शवते ज्यामध्ये एलियन जीवन असू शकते. आता आपण पुढील सहस्रकामधील तांत्रिक विकासाच्या संदर्भात मानवाच्या स्थितीबाबतही विचार केला पाहिजे, असे आवाहन सोमनाथ यांनी केले. 4 / 5इस्रोप्रमुखांनी केलेल्या दाव्यानुसार अशा काही एलियनच्या संस्कृती असू शकतात, ज्या मानवापेक्षा १ हजार वर्षांनी पुढे आहेत. तसेच ब्रह्मांडामध्ये आधीपासून अस्तित्वात असू शकतात. कदाचित ते मानवासोबत त्यांच्या पद्धतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असलीत. मात्र त्यांचे संकेत आपल्याला अद्याप समजता येत नसतील. 5 / 5ब्रह्मांडामध्ये जीवनाचं रूप मानवाच्या तुलनेत अधिक विकसित असू शकतं. त्यामुळे इस्रोच्या प्रमुखांना पृथ्वीबाहेर ब्रह्मांडात जीवनाचं अस्तित्व हे वास्तविक वाटतं. ब्रह्मांडाचा विचार केल्यास येथे मानव खूप नवा आहे. तसेच जीवन आणि अधिक विकसित संस्कृती ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरलेल्या असू शकतात, असे सोमवाथ यांना वाटते. आणखी वाचा Subscribe to Notifications