शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रवासादरम्यान एका व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह, ट्रेनमध्ये उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 7:07 PM

1 / 10
कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कोरोना संक्रमित व्यक्ती आजूबाजूला आढळला तरी लोकांचा भीतीनं थरकाप उडतो. कोरोनानं प्रत्येकाच्याच मनात घर केलेलं आहे.
2 / 10
अशातच बाजारात किंवा सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आल्यास लागलीच आपण पळ काढतो. अशा परिस्थितीत जेव्हा एखादा व्यक्ती गाडीने प्रवास करतोय आणि अचानक त्याला कळले की तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. हो, अशीच एक घटना घडली आहे.
3 / 10
कोझीकोड-तिरुअनंतपुरम जनशताब्दी एक्सप्रेसमधून प्रवास करत असलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं एकच खळबळ उडाली. अधिका-यांनी सांगितले की, चाचणी अहवाल येण्यापूर्वीच कन्याकुमारी येथील एक व्यक्ती ट्रेनमध्ये चढला होता. हा अहवाल सकारात्मक येताच त्याला ट्रेनमधून खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
4 / 10
अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, कोझिकोड जिल्ह्यातील कुन्नमंगलम येथील एका मजुराने काही लक्षणे जाणवल्यानंतर कोझिकोड येथे तीन दिवसांपूर्वी कोरोना टेस्टसाठी स्वॅब दिला होता. चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच तो आपल्या गरोदर पत्नीला इस्पितळात दाखल करण्यासाठी आपल्या गावी जात होता.
5 / 10
ती व्यक्ती तामिळनाडूहून आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढली. प्रवासादरम्यान त्याला आरोग्य अधिका-यांचा फोन आला आणि एर्नाकुलम टाऊन रेल्वे स्थानकात उतरण्यास सांगण्यात आले.
6 / 10
वृत्तानुसार कोझिकोडमधील आरोग्य अधिका-यांनी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला, परंतु ट्रेन आधीच स्टेशन सोडून निघाली होती.
7 / 10
त्यानंतर त्याने त्रिशूर जिल्ह्यातील आरोग्य अधिका-यांना माहिती दिली, तो थ्रिसूर स्टेशन गाठायचा तोपर्यंत तेथूनही ट्रेन सुटली होती.
8 / 10
एर्नाकुलममध्ये आरोग्य अधिका-यांनी त्या व्यक्तीला ट्रेनमधून खाली नेले आणि रुग्णालयात दाखल केले.
9 / 10
रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले की, संसर्ग झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ज्या डब्यात त्याने प्रवास केला होता, तो डबा सील करण्यात आला, जेणेकरून इतरांना प्रवेश करू नये. जे लोक त्या कोरोना रुग्णाच्या डब्यात होते, त्यांनाही रेल्वेच्या दुस-या सीटवर स्थानांतरित करण्यात आले.
10 / 10
रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले की, संसर्ग झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ज्या डब्यात त्याने प्रवास केला होता, तो डबा सील करण्यात आला, जेणेकरून इतरांना प्रवेश करू नये. जे लोक त्या कोरोना रुग्णाच्या डब्यात होते, त्यांनाही रेल्वेच्या दुस-या सीटवर स्थानांतरित करण्यात आले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या