marriage stopped after minor girl protested in jharkhand koderma
'मी अल्पवयीन आहे, आताच लग्न करायंच नाही', मुलाकडील मंडळींना मुलीने केला फोन अन्.... By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 3:03 PM1 / 10झारखंडच्या कोडरमामध्ये एका अल्पवयीन मुलीने आपल्या कुटुंबातील सदस्यांविरोधात जाऊन दाखवलेल्या धैर्याबाबत तिचे कौतुक करण्यात येत आहे. 2 / 10शिक्षण घेऊन काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या या अल्पवयीन मुलाचे लग्न ठरले होते. मात्र, लग्नाआधी तिने वराकडील मंडळींना फोन करून लग्न करण्यास नकार दिला. ती म्हणाली, 'मी आता अल्पवयीन आहे ...'3 / 10ही घटना कोडरमा जिल्ह्यातील डोमचांच भागातील मधुबन पंचायतीची आहे. येथे राहणारी अल्पवयीन राधा अवघ्या 17 वर्षांची आहे. राधाच्या पालकांनी तिचे लग्न ठरविले होते. 4 / 10या लग्नासाठी मिरवणूक येणार होती, पण राधाने हे लग्न होऊ दिले नाही. राधाला पुढचे शिक्षण घेऊन एक चांगली शिक्षिका व्हायचे आहे, म्हणून तिने या लग्नाच्या विरोधात केला.5 / 10कुटूंबातील सदस्यांनी राधाला न कळवता लग्न ठरविले होते. यावर राधाने आपल्या कुटूंबातील सदस्यांना कमी वयात लग्न न करण्याविषयी बरेच काही समजावून सांगितले, परंतु तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिचे म्हणणे ऐकले नाही आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. 6 / 10त्यानंतर राधाने मुलाकडील मंडळींना स्वत: हून फोन केला आणि सांगितले की, तिचे वय अद्याप लग्नाचे नाही. 'मी बालविवाह करू शकत नाही आणि मला अभ्यास करून शिक्षिका व्हायचे आहे', असे राधा म्हणाली. 7 / 10राधाने लग्नाला विरोध केला म्हणून हे लग्न टळले. दरम्यान, राधाच्या या धैर्याबाबत तिचे खूप कौतुक केले जात आहे.राधा मधुबन पंचायतीची रहिवासी असून राधाच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. राधाला तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत.8 / 10कोडरमाचे उपायुक्त रमेश घोलप यांना याची माहिती मिळताच ते राधा हिचे घर गाठले. यावेळी राधाने तिच्या कुटुंबाच्या निर्णयाला विरोध केला, त्या जागृतीसाठी तिला भेट म्हणून सन्मानपत्र, शाल आणि पुस्तके देण्यात आली.9 / 10दरम्यान, आता बालविवाह रोखण्यासाठी प्रेरणा म्हणून राधा हिला जिल्ह्यातील ब्रँड अॅम्बेसेडरही बनविण्यात येणार आहे. याशिवाय राधा सुकन्या योजनेशीही जोडली गेली आहे, ज्यामुळे मुलगीला शिक्षण घेण्यास मदत मिळेल. 10 / 10उपायुक्त रमेश घोलप म्हणाले की, राधा हिचे हे कार्य इतर मुलींसाठी प्रेरणादायक ठरेल. आणखी वाचा Subscribe to Notifications