Martyrs in Galwan honored by Indian Army, memorial erected in DBO
गलवानमधील हुतात्म्यांचा भारतीय लष्कराकडून मोठा सन्मान, DBO मध्ये उभारले स्मृतिस्थळ By बाळकृष्ण परब | Published: October 04, 2020 12:03 AM1 / 5 १५ जून रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. 2 / 5दरम्यान, भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात हुतात्मा झालेल्या जवानांची आठवण म्हणून दौलत बेग ओल्डी येथे एक स्मृतिस्थळ उभारले आहे. या स्मृतिस्थळावर एका अधिकाऱ्यासह २० जवानांचे नाव कोरले आहे. 3 / 5 १५ जून रोजी गलवानमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांनी दगाबाजी करत भारताच्या जवानांवर हल्ला केला होता. त्यात २० जवानांचा मृत्यू झाला होता. तर भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात चीनचे ४० ते ६० सैनिक मारले गेले होते. 4 / 5या स्मृतिस्थळाच्या ठिकाणी २० जवानांच्या नावांसह १५ जून रोजी झालेल्या संपूर्ण स्नो लेपर्ड ऑपरेशनची माहिती देण्यात आली आहे. या झटापटीमध्ये १६ व्या बिहार रेजिमेंटच्या कर्नल संतोष बाबूंसह इतर १९ जवानांचा मृत्यू झाला होता. 5 / 5 हा हल्ला म्हणजे चीनने रचलेले कारस्थान असल्याचा आरोप केला होता. तसेच या हल्ल्यानंतर भारताने लडाखमध्ये आपले बळ सातत्याने वाढवले आणि २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याचा अशाच एका हल्ल्याचा डाव हाणून पाडला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications