Mehul Choksi is doing a PhD on Prime Minister Narendra Modi
मेहुल चोक्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पीएचडी करतोय By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 1:28 PM1 / 7मेहुल चोक्सी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पीएचडी करत आहे. यासंबंधीचा त्याने शोध निबंधही विद्यापीठाकडे सोपविला आहे. सरकारी अधिकारी, शेतकऱ्यांसह 450 लोकांशी त्याने चर्चा केली आहे. हा मेहुल चोक्सी म्हणजे फरार हिरे व्यापारी नसून सुरतचा एक विद्यार्थी आहे. हिरे व्यापारी चोक्सी हा सध्या अँटीग्वामध्ये राहत आहे. 2 / 7मेहुल हा वीर नरमद दक्षिण गुजरात विद्यापीठामध्ये पीएचडी करत आहे. त्याच्या शोध निबंधाचे नाव 'लीडरशीप अंडर गव्हर्नमेंट- केस स्टडी ऑफ नरेंद्र मोदी' आहे. मेहुल राजकीय विज्ञानमध्ये पदवीधारक आहेत. 3 / 7मेहुल याने 450 लोकांशी चर्चा केली आहे. यामध्ये सरकारी अधिकारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यामे 32 प्रश्न तयार केले होते. यामध्ये 450 पैकी 25 टक्के लोकांनी त्यांच्या भाषणावर विश्वास दर्शविला. तर 48 टक्के लोकांनी मोदींना राजकीय व्यवस्थापनात माहीर असल्याचे मत मांडले आहे. 4 / 7मेहुल हा वकीलही आहे. त्याने वीर नरमद विद्यापीठाचे प्राध्यापक निलेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मेहुल याने पीएचडीची सुरुवात केली होती. त्याने लोकांना मोदींच्या मुख्यमंत्री कार्यकाळातीलही प्रश्न विचारले होते. 5 / 7यावेळच्या प्रश्नांना 51 टक्के लोकांनी सकाराम्तक आणि 34.25 टक्के लोकांनी नकारत्मक उत्तरे दिली. तर 46.75 टक्के लोकांनी सांगितले की एखाद्या नेत्याला लोकप्रिय व्हायचे असेल तर त्याला लोकांच्या फायद्याचे निर्णय घ्यायला हवेत. 6 / 7चोकसीच्या या शोधनिबंधामध्ये 81 टक्के लोकांनी सांगितले की देशाचा पंतप्रधान बनण्यासाठी सकारात्मक विचार करणारा माणूस हवा. 31 टक्के लोकांनी प्रामाइमक आणि 34 टक्के लोकांमी पारदर्शकपणावर जोर दिला. 7 / 7प्राध्यापक निलेश जोशी यांच्यामुसार पीएचडीचा विषय खूप रंजक होता. माहिती गोळा करताना काही अडथळेही होते. कारण एखादा व्यक्ती मोठ्या पदावर असेल तर त्याच्याविषयी निष्पक्ष मत मांडणारेही कमीच असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications