By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 16:58 IST
1 / 5राजस्थानमधलं ब्रह्मा मंदिर- या मंदिरात ब्रह्मदेव विराजमान आहेत आणि जगात हे ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर आहे. पुष्कर सरोवराकाठी ब्रह्मदेव देवी सरस्वतीबरोबर यज्ञ करणार होते. त्यावेळी सरस्वती देवीला सरोवराकाठी पोहोचण्यास उशीर झाला. तेव्हा त्यांनी गायत्री देवी लग्न करून यज्ञ संपन्न केला. तेव्हा सरस्वती देवीनं शाप दिला की, विवाहित पुरुष या मंदिरात कधीही प्रवेश करू शकणार नाही. 2 / 5अट्टुकल मंदिर- केरळमधलं अट्टुकल मंदिर हे महिलांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी या मंदिरात 30 लाख महिला येतात. हे मंदिर देवी कन्नकी(पार्वती) यांना समर्पित करण्यात आलं आहे. या मंदिरात पुरुषांना बंदी आहे. 3 / 5कन्याकुमारी मंदिर- कन्याकुमारीमधलं हे भागती मातेचं मंदिर आहे. विशेष म्हणजे हे मंदिर तीन समुद्राच्या सभोवती वसलेलं आहे. विवाहित पुरुषाला या मंदिरात प्रवेश नाही. हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. विवाहित पुरुष या मंदिरात प्रवेश करू शकत नाही. 4 / 5उत्तर प्रदेशमधलं माता मंदिर- काही विशेष काळात मंदिरात पुरुषांना प्रवेश दिला जात नाही. परंतु इतर वेळी पुरुष या मंदिरात प्रवेश करू शकतात. 5 / 5चक्कुलाथुकावू श्री भगवती मंदिर- नीरत्तुपुरम येथे वसलेलं हे दुर्गा मातेचं मंदिर भाविकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. पोंगलदरम्यान या मंदिरात नारी पूजाही केली आहे. त्यादरम्यान फक्त महिलांनाच मंदिरात प्रवेश दिला जातो.