शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'भाजपाला रिपाइं (आ) मध्ये विलिन करुन, आठवलेंना पंतप्रधान करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 1:17 PM

1 / 15
केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी खासदार शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे, असा सल्ला दिलाय. त्यानंतर, नेटीझन्सने ट्विटर आणि सोशल मीडियातून मिम्म बनवले आहेत. आठवलेंच्या ट्विटवरही मजेशीर कमेंट दिल्या आहेत.
2 / 15
काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत. काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही.
3 / 15
त्यामुळे माझी काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
4 / 15
काँग्रेस हा या देशातील मोठा आणि जुना पक्ष आहे. मात्र या पक्षाला सध्या सक्षम द्रष्टे नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचे पानिपत झाले आहे. कधी काळी ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष आता १०० खासदार ही निवडून आणू शकत नाही.
5 / 15
दलित बहुजनांचा विश्वास तुटल्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यामुळे काँग्रेस चे अध्यक्ष पद सांभाळण्यास कुणी पुढे येत नाही. अशा परिस्थितीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस मध्ये विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार यांना बहाल करावे.
6 / 15
माझ्या या सूचनेबाबतचा निर्णय सर्वस्वी काँग्रेस आणि शरद पवार यांनी घ्यावा,असेही आठवले यांनी म्हटले आहे. आठवलेंच्या या स्टेटमेंटवर नेटीझन्सनेही त्यांना अनेक मजेशीर सल्ले दिले आहेत.
7 / 15
आठवलेंच्या या सल्ल्यानंतर अनेकांनी त्यांनाही सल्ला दिला आहे, तर काहींनी यावर कवितेची फर्माईश केलीय
8 / 15
ट्विटरवरुन अनेक मिम्सही बनविण्यात आले आहेत.
9 / 15
हे थोडं अति होतंय, आठवले साहेब.. असंच एकाने सूचवलं आहे.
10 / 15
काहींनी आठवलेंना रिपाइं पक्षाचे वंचित बहुजन आघाडीत विलगीकरण करण्याचे सूचवले आहे.
11 / 15
हे मिम्स पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
12 / 15
सुबोध भावेंसोबत पवार साहेबांची चर्चा, अफलातून मिम्स
13 / 15
अक्षयकुमार आणि राजपाल यादव म्हटल्यावर कॉमेडी तो बनती है बॉस...
14 / 15
रामदास आठवलेंच्या स्टेटमेंटला साजेचा असा हा फोटो, ज्यामध्ये आठवलेही काँग्रेसमध्ये दिसतात.
15 / 15
एका युजर्सने तर रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाला अमेरिकेच्या रिपाइंमध्ये समावेश करण्याचा सल्ला देत, राष्ट्राध्यक्ष होण्याचं सूचवलं आहे.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRamdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणMumbaiमुंबई