Milind told Narvekar after the election of Atyananda, Tirupati Devasthan member ...
मिलिंद नार्वेकरांना अत्यानंद, तिरुपती देवस्थान सदस्यपदाच्या निवडीनंतर म्हणाले... By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 1:18 PM1 / 12देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. 2 / 12या नियुक्तीसाठी स्वत: उद्धव ठाकरेंनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना शिफारस केली होती. त्यानंतर बुधवारी आंध्र प्रदेश सरकारने तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी जाहीर करणारं परिपत्रक काढलं. 3 / 12आंध्र प्रदेशच्या या पत्रकामध्ये महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. 4 / 12 या देवस्थानच्या ट्रस्ट सदस्यपदासाठी देशभरातून २४ सदस्यांची निवड केली जाते. त्या पदासाठी अनेक चढाओढ लागलेली असते. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन सदस्यपदासाठी नावं सुचवतात. 5 / 12महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना फोन करून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर नार्वेकरांची अधिकृत घोषणा करण्यात आली. 6 / 12या निवडीनंतर मिलिंद नार्वेकर यांनी आंध्र प्रदेश सरकार आणि संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहे. ट्विटरवरुन नार्वेकर यांनी ही कृतज्ञता व्यक्त केली. 7 / 12माझ्या हातून सेवा घडावी यासाठी देवानेच हे द्वार उघडले आहे. हे माझे भाग्य आहे, असेही नार्वेकर यांनी म्हटले आहे. 8 / 12मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. 9 / 12१९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. 10 / 12एका सामान्य कुटुंबात जन्माला जन्मलेले मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे शाखाप्रमुख होण्यासाठी धडपडत होते. मुलाखत देण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. 11 / 12पहिल्याच भेटीत वाकचातुर्य पाहून उद्धव ठाकरेही प्रभावित झाले. नार्वेकरांचं एकंदरीत अनुभव आणि कौशल्य पाहता उद्धव ठाकरेंनी त्यांना फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी सोपवायची याबाबत त्यांना विचारणा केली.12 / 12या निवडीनंतर सोशल मीडियातून आणि शिवेसेनेतील नेत्यांकडून मिलिंद नार्वेकरांचं अभिनंदन करण्यात येत आहे. तिरुमल्ला तिरुपती हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान आहे आणखी वाचा Subscribe to Notifications