Is the milk bag corona free? How to sanitize ... FSSAI answered
दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 2:32 PM1 / 102 / 10घरात आणल्यावर किंवा बाहेरच या वस्तू पाण्यामध्ये किंवा अल्कोहोल मारून सॅनिटाईज करण्याकडे लक्ष देत आहेत. काही ठिकाणी तर साबनाने धुतल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशावेळी आपण जी रोज दुधाची अर्धा, एक लीटर दुधाची पिशवी घेतो ती कोरोना फ्री आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. 3 / 10हा प्रश्न निश्चितरित्या तुम्हाला दुविधेमध्ये टाकणार आहे. कारण मेडिकल आणि किराना मालाच्या, दुधाच्या दुकानांना स्थानिक लॉकडाऊनमध्येही परवानगी आहे. यामुळे तिथून कोरोना पसरण्याची शक्यता अधिक आहे. 4 / 10अशावेळी हे दूध जर संक्रमित झालेले असेल तर असा प्रश्न मनात डोकावू लागतो. यावर एफएसएसएआयने उत्तर दिले आहे. ( Food Safety and Standards Authority of India (FSSAI) 5 / 10FSSAI सांगितले की, पॅकबंद दूध हे पूर्णत: सुरक्षित आहे. त्याद्वारे कोरोनाची लागण होऊ शकत नाही. दुधाच्या पिशव्या या साबनाने धुतल्या जात असल्याचे समजताच एफएसएसएआयने दूधाच्या सुरक्षित वापरावर काही उपाय सांगितले आहेत. 6 / 10पहिला म्हणजे दूधवाला किंवा कोणत्याही दुकानातून दुधाची पिशवी घेताना सरकारने घालून दिलेले सामाजिक सुरक्षा, मास्क आदी नियम पाळावेत. तसेच विक्रेत्यानेही मास्क घातला आहे का हे पहावे. 7 / 10FSSAI ने लोकांना आवाहन केले आहे की, दूध पाकिट घेतल्यानंतर ते घरी आणावे. आपले हात स्वच्छ धुवून घ्यावेत. तसेच दुधाची पिशवी केवळ पाण्याने धुवून घ्यावी. दुधाच्या पाकिटावर सॅनिटायझर स्प्रे केल्यानंतर या डिटर्जंट किंवा सॅनिटाझर मारण्याची कोणतीही आवश्यकता नाही. 8 / 10दूध पाण्याने धुवून घेतल्यानंतर पिशवी फोडून धुतलेल्या हातांनी भांड्यामध्ये ओतावे. यानंतर दूध पूर्ण उकळेपर्यंत गॅस बंद करू नये. 9 / 10FSSAI ने सांगितले की या सोप्या उपायांनी तुम्ही वापरत असलेले दूध कोरोना सुरक्षित असल्याचा विश्वास वाटेल. 10 / 10FSSAI नुसार रासायनिक सॅनिटायझर स्प्रे किंवा डिटर्जंटचा वापर दुधासाठी करणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications