शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बागेश्वर महाराजांसारखं तिलाही येतं, पहिलीपर्यंतचं शिकली अन्...; जाणून घ्या, सुहानी शाहबद्दल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 9:58 AM

1 / 8
बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबा गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. लोकांच्या मनात काय सुरु आहे, हे ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यामुळे त्यांचा दरबारात देशभरातून अनेक जण येत आहेत. बागेश्वर महाराज यांच्या दाव्यावर मोठी चर्चा सध्या सुरु आहे. मात्र याचदरम्यान 'माईंड रीडर' सुहानी शाह देखील चर्चेत आली आहे.
2 / 8
सुहानी शाह प्रसिद्ध माइंड रीडर आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून लोकांच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखण्याचे काम त्या करत आहेत. यासंदर्भात तिने अनेक लाईव्ह शो केले आहेत. फक्त पहिलीपर्यंत शिक्षण सुहानीचे झाले आहे. ६० विद्यार्थ्यांसोबत राहण्यापेक्षा ६० हजार लोकांसमोर कार्यक्रम घेण्याचा तिच्या वडिलांनी सल्ला दिला. त्यानंतर शाळा सोडली अन् लाईव्ह शो करुन लोकांचे मन ओळखू लागल्या.
3 / 8
सुहानी शाहचा जन्म २९ जानेवारी १९९० रोजी उदयपूर, राजस्थान येथे झाला. माईंड रीडर असण्याव्यतिरिक्त, सुहानी स्वतःला कॉर्पोरेट ट्रेनर, लाइफ कोच आणि प्रोफेशनल हिप्नोथेरपिस्ट म्हणून वर्णन करते. सुहानीने पाच पुस्तकेही लिहिली आहेत. सुहानीच्या वडिलांचे नाव चंद्रकांत शाह असून ते फिटनेस एकाग्रता आणि प्रशिक्षक आहेत. आई स्नेहलता शाह गृहिणी आहेत. तसेच सुहानी शाह यांना एक मोठा भाऊ देखील आहे.
4 / 8
बागेश्वर महाराज जे करतात तेच सुहानी शाह करत आहे. आपल्याजवळ असलेली ही देण एक कला व ट्रिक असल्याचे ती सांगते. मी सराव करुन तिला अधिक विकसित केले आहे. ही कला आपण कोणालाही शिकवण्यास तयार असल्याचे तिने स्पष्ट केले.
5 / 8
सुहानी शाह म्हणाली की, लहानपणापासून माईंड रिडिंगचं मला पॅशन होतं, ते मी पूर्ण केलं, मी पहिलीची शिकली असली, तरी मी या कलेवर पुस्तकं लिहिली आहेत. कारण देशभर फिरत असताना अनेक लोकांशी भेटीगाठी आणि संवाद झाले यात भाषेचं ज्ञान मिळालं. मी माझी इंग्रजी अधिक सुधारण्यावर अजुनही भर देत आहे, असं सुहानीने सांगितलं.
6 / 8
सुहानी शाहने मोटिव्हेशनल स्पीकर आणि यूट्यूबर संदीप माहेश्वरी यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती इयत्ता पहिलीपर्यंतच शाळेत गेली, त्यानंतर तिने शाळा सोडली. सुहानीने सांगितले की, मी लहानपणापासून माझी आवड निवडली आहे.
7 / 8
सुहानी शाह सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिने २१ ऑक्टोबर २००७ रोजी त्यांचे YouTube चॅनल सुरू केले होते. २०१०मध्ये Twitter जॉईन केले. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर सुहानीचे १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. सुहानीने कॉमेडियन झाकीर खान, करीना कपूर, सायना नेहवाल आणि संदीप माहेश्वरी यांसारख्या सेलिब्रिटींसोबत शो केले आहेत.
8 / 8
सुहानी शाह YouTube वर 'दॅट्स माय जॉब कम्पाइलेशन' ही ऑनलाइन मालिका होस्ट करते, ज्यामध्ये ती मोठ्या संख्येने अभ्यागतांना आमंत्रित करते आणि त्यांना सहभागींच्या व्यवसायाचा अंदाज लावण्याचे आव्हान देते.
टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामSocial Viralसोशल व्हायरल