Modi government advice selling enemy assets worth rs 1 lakh crore help in growth
PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा! By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 5:19 PM1 / 12कोरोना काळात आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच शत्रू संपत्ती विकण्याच्या तयारीत आहे. यातून केंद्र सरकारला एक लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिकची कमाई होऊ शकते. 2 / 12शत्रू संपत्ती विकण्यासंदर्भातील योजनेवर अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. मात्र, आता कोरोना काळात याचा लवकरात लवकर निकाल लावला जाऊ शकतो. यासाठी कायदा आणण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. 3 / 12पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पार्ट टाइम सदस्य नीलेष शाह यांनी सांगितले, की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 1965च्या युद्धानंतर शत्रू संपत्तीचे अधिग्रहण करण्यासंदर्भात कायदा तयार केला आहे.4 / 12नीलेष शाह यांनी सांगितल्यानुसार, अशाप्रकारची सर्व संपत्ती पाकिस्तानने 1971मध्येच विकली आहे. मात्र या बाबतीत भारत पाकिस्तानच्या तुलनेत 49 वर्ष मागे आहे.5 / 12शाह म्हणाले, ‘‘भविष्यातील खर्चासाठी आपल्याकडे धन उपलब्ध असावे, यासाठी आपण सरकारी संपत्ती मॉनिटाईझ करायला हवी.’’ 6 / 12या शत्रू संपत्तीची किंमत तीन वर्षांपूर्वी अंदाजे एक लाख कोटी रुपये एवढी होती, असेही शाह यांनी सांगितले. 7 / 12या शिवाय, शाह म्हणाले, अशा प्रकारची संपत्ती विकून अतिक्रमण काढणे आणि मालकी हक्काची विसंगती दूर करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. 8 / 12अशा प्रकारच्या 9,404 संपत्ती 1965 साली सरकारने नियुक्त केलेल्या कस्टोडियनच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. 9 / 12अशा प्रकारच्या 9,404 संपत्ती 1965 साली सरकारने नियुक्त केलेल्या कस्टोडियनच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. 10 / 12यात 1947 साली झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान भारताकडे राहिलेली घरे, हवेल्या-कोठ्या, जमीनी-दागदागिने, कंपन्या आदींचा समावेश होतो. या सर्वांवर भारत सरकारचा ताबा आहे.11 / 12यासंदर्भात मोदी सरकारने याच वर्षी तीन उच्च स्थरिय समित्या तयार केल्या आहेत.12 / 12केंद्र सरकारने ज्या तीन समित्या तयार केल्या आहेत, त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थ मंत्री निर्मला सीतारमण आणि रस्ते व वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications