मृत्यूशी झुंज अपयशी! कोरोनाची लढाई जिंकले पण Black Fungus ने जीवन संपवले; 303 जणांनी गमावला जीव By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 3:49 PM1 / 14देशातील कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र असं असताना Black Fungus चा धोका वाढला आहे.2 / 14'ब्लॅक फंगस' म्हणजेच 'म्युकोरमायकोसिस' हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत.3 / 14'म्युकोरमायकोसिस' असं या आजाराचं नाव असून कोरोना रुग्णांमध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत4 / 14देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.5 / 14देशातील अनेक राज्यात ब्लॅक फंगसचा हाहाकार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना या सातत्याने करण्यात येत आहेत.6 / 14देशभरातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करून कोरोनाची लढाई जिंकली आहे पण Black Fungus ने त्यांचं जीवन संपवलं आहे. तब्बल 303 जणांनी आपला जीव गमावला आहे. 7 / 14कर्नाटकमध्ये कोरोनातून ठिक झाल्यानंतर ब्लॅक फंगसची लागण झालेल्या 303 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील 34 टक्के रुग्ण हे बंगळुरूमधील होते. 8 / 14टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकमध्ये 9 जुलैपर्यंत ब्लॅक फंगसचे 3491 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 8.6 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरूतील रुग्णांची संख्या सर्वाधिक असून तेथील 104 जणांचा मृत्यू झाला आहे. 9 / 14कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण होत असल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 14रुग्णांवर सर्जरी केल्यानंतरही Black Fungus चा पुन्हा धोका असल्याची आता माहिती मिळत आहे. यामुळे डॉक्टरही हैराण झाले असून वेळीच सावध असं सांगण्यात येत आहे. सर्जरीनंतरही ब्लॅक फंगस वेगाने पसरत आहे.11 / 14एसएमएस मेडिकल कॉलेजच्या म्युकोरमायकोसिस बोर्डच्या रिसर्चमध्ये याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. रिसर्चनुसार, एसएमएस रुग्णालयात आतापर्यंत 27 रुग्ण आढळून आलेत ज्यांना सर्जरीनंतर पुन्हा ब्लॅक फंगसची लागण झाली आहे.12 / 14रुग्णालयात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 450 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 410 जणांवर सर्जरी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 25 रुग्ण असे होते. ज्यांच्या मेंदूपर्यंत ब्लॅक फंगस पोहोचला होता.13 / 14ब्लॅक फंगसमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. य़ावर मुख्य औषध असणाऱ्या एम्फोटेरिसिनची सध्या कमतरता असल्याने चिंतेत भर पडली असल्याची माहिती मिळत आहे. 14 / 14काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications