शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 2:03 PM

1 / 10
देशाच्या सीमांवर जवानांसोबत आता ‘मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट’ अर्थात रोबोटिक श्वान देखील तैनात करण्यात येणार आहेत. ते कोणताही उंच पर्वतापासून पाण्यात खोलवर जाऊन काम करण्यास सक्षम आहेत.
2 / 10
रोबोटिक श्वानांचा काही आठवड्यांपूर्वी लष्करी उपकरणांच्या प्रदर्शनात डेमो दाखविण्यात आला होता. त्यानंतर त्यांची लष्करासोबत चाचणी करण्यात आली.
3 / 10
जैसलमेर येथील पोकरण फायरिंग रेंजमध्ये रोबोटिक श्वांनांनी सैन्याच्या बॅटल एक्स विभागासोबत १४ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत युद्धाभ्यासही केला. त्यात १० श्वानांना सहभागी करून घेण्यात आले होते.
4 / 10
शत्रुला शोधणे, शस्त्र नेणे, कॅमेऱ्याद्वारे शत्रुच्या ठिकाणांची माहिती देणे इत्यादी चाचण्या यावेळी करण्यात आल्या. भारतीय सैन्याने सीमेलगतच्या विशेषत: उंच ठिकाणांवर गस्तीसाठी १०० रोबोटिक श्वानांचा समावेश केला आहे.
5 / 10
चीनने यापूर्वीच अशा श्वानांचा समावेश केलेला आहे. बर्फाळ प्रदेश, वाळवंट, उंच पायऱ्या तसेच पर्वतीय भागातील सर्व अडथळ्यांना पार करण्यास हे श्वान सक्षम आहेत.
6 / 10
रोबोटिक श्वान कसे काम करतात? - हा एक प्रकारचा रोबोट आहे. त्यात अत्याधुनिक आणि अतिशय शक्तिशाली लेन्स व ट्रान्समिटर्स लावण्यात आले आहेत.
7 / 10
या रोबोटला चार पाय असून रचना श्वानांप्रमाणे आहे. शत्रुला शाेधून त्यांना संपिवण्याचा युद्धाभ्यास करण्यात आला आहे.
8 / 10
काय आहेत वैशिष्ट्ये? - १० किलोमीटर अंतरावरून नियंत्रित करणे शक्य आहे. थर्मल कॅमेरे, रडार आणि शक्तिशाली ट्रान्समीटरने सज्ज. कॅमेरा ३६० अंशात वळविणे आणि झूम करण्यास सक्षम आहे.
9 / 10
शत्रुच्या ठिकाणांवर गोळीबार करण्याची क्षमता या रोबोटिक श्वानाची आहे. ४० ते ५५ अंश सेल्सिअस अंश तापमानात करण्यास हा रोबोटिक श्वान सक्षम आहे.
10 / 10
१ तास चार्ज केल्यानंतर हा रोबोटिक श्वान १० तास काम करु शकतो. १५ किलो वजन उचलण्याची क्षमता या रोबोटिक श्वानाची आहे, हे विशेष.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानRobotरोबोटtechnologyतंत्रज्ञानDefenceसंरक्षण विभाग