शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 1:27 PM

1 / 10
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई वाढवली आहे. मुंबई पोलिसांनी दोन दिवसापूर्वी हरयाणा येथून लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर सुखवीर उर्फ ​​सुखा याला ताब्यात घेतले आहे.
2 / 10
शूटर सुख्खा याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी तिन महिन्यापासून तयारी करत होते. यासाठी पोलिसांनी एका तरुणीची मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे.
3 / 10
सुख्खा हनीट्रॅपमध्ये अडकला होता. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी एका मुलीच्या माध्यमातून हा सापळा रचला होता. ही मुलगी सुख्खाच्या सतत संपर्कात होती आणि त्याच्याशी बोलून त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत होती. यामध्ये बुधवारी रात्री पोलिसांना यश आले.
4 / 10
गुरुवारी मुंबई पोलिसांच्या पथकाने बिश्नोई गँगचा शूटर सुख्खा याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्याला आता मुंबईला आणण्यात आले आहे.
5 / 10
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स टोळी आणखी एका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गोळीबार प्रकरणी पणवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 / 10
या प्रकरणी पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या सहा गुंडांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत पानिपतच्या रायरकला गावात राहणारा सुखवीर उर्फ ​​सुख्खा याचे नाव पुढे आले. गोळीबार प्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे. मुंबई पोलिसांनी त्याचा गेल्या तीन महिन्यापासून शोध सुरु केला होता.
7 / 10
यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी सापळा रचण्यास सुरुवात केली. एका तरुणीने सुखाशी संपर्क साधून त्याच्याशी मैत्री केली. ती सतत त्याच्या संपर्कात होती.
8 / 10
योजनेनुसार बुधवारी तरुणीने पानिपतमधील हॉटेल अभिनंदन येथे रूम बुक केली आणि सुख्खाला फोन केला. तरुणी म्हणाली, मी खूप मद्य प्यायली आहे आणि कुठेतरी पानिपतमध्ये आहे, पण शहरात कुठल्या ठिकाणी आहे ते माहित नाही. मी लोकेशन पाठवत आहे, इकडे ये. सुख्खाने येण्यास टाळाटाळ करत तरुणीला विचारले की, तुम्ही मला पकडण्याचा कट रचत नाही. यावर तरुणीने सांगितले की, आल्याने फायदा होऊ शकतो. यानंतर सुख्खा तरुणीच्या लोकेशनवर पोहोचला. दोघांनी आधी हॉटेलच्या रुम नंबर १०४ मध्ये मद्य प्यायली.
9 / 10
याचवेळी तरुणीने दुसऱ्या मजल्यावर तैनात असलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकाला गुपचूप मिस कॉल केला. पथकाने पहिल्या मजल्यावर पोहोचून सुख्खाला अटक केली.
10 / 10
याचवेळी तरुणीने दुसऱ्या मजल्यावर तैनात असलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकाला गुपचूप मिस कॉल केला. पथकाने पहिल्या मजल्यावर पोहोचून सुख्खाला अटक केली.
टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसSalman Khanसलमान खानPoliceपोलिस