शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mysore Dussehra Festival: …म्हणून म्हैसूरचा दसरा आहे खास, जगभरात चर्चा, अशी आहेत वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 12:05 PM

1 / 11
आज विजयादशमी, दसरोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. देशातील प्रत्येक भागातील प्रत्येक भागात दसरोत्सव हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. मात्र म्हैसूरमधील दसरोत्सव हा त्याच्या भव्यतेमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. हा दरसोत्सव १० दिवस साजरा केला जातो. तसेच देशविदेशातून लोक हा दसरा पाहायला येतात.
2 / 11
१० दिवसांपर्यंत चालणारा दसऱ्याचा उत्सव हा चामुंडेश्वरी देवीकडून महिषासुराच्या वधाचं प्रतीक मानला जातो. दुर्गामातेचा अवतार असलेल्या चामुंडेश्वरीने १० दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला होता. म्हणून १० दिवसांपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.
3 / 11
म्हैसूरच्या दसऱ्याचा इतिहास म्हैसूर शहराच्या इतिहासाशी निगडीत आहे. तो विजयनगर साम्राज्यापासून सुरू होतो. या साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्क या भावांनी केली होती. या साम्राज्यात नवरात्रौत्सव साजरा केला जात असे. सुमारे सहा शतके जुन्या या उत्सवाला वाडियार वंशातील लोकप्रिय राजे कृष्णराज वाडियार यांनी दसऱ्याचे रूप दिले.
4 / 11
म्हैसूरच्या दसऱ्याची सुरुवात ही चामुंडी डोंगरावर असलेल्या देवी चामुंडेश्वरीच्या मंदिरात विशेष पूजेने होते. या दसरोत्सवात म्हैसूरचा राजमहाल ९० हजार तर चामुंडेश्वरी मंदिर असलेला डोंगर दीड लाख वीजेच्या दिव्यांनी सजवला जातो.
5 / 11
या दसरोत्सवात सजवलेले हत्तीही सहभागी केले जातात. त्या हत्तींसोबत निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते.
6 / 11
विजयादशमी दिवशी म्हैसूरच्या रस्त्यांवर मिरवणूक निघते. त्यावेळी सजवलेल्या हत्तींवरील सोन्याच्या अंबारीत देवी चामुंडेश्वरीची मूर्ती ठेवली जाते. देवीची पूजा राजघराण्याकडून केली जाते.
7 / 11
रोषणाईने झळाळलेला म्हैसूर पॅलेस, विविध कार्यक्रम देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतात.
8 / 11
विजयादशमीच्या आधी नवमी दिवशी म्हैसूरचे राजे यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांनी शस्त्रपूजा केल्यानंतर काही खास फोटो शेअर केला आहेत.
9 / 11
या फोटोंमध्ये राजे पूजा करताना दिसत आहेत.
10 / 11
म्हैसूरच्या दसरोत्सवादरम्यान १० दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
11 / 11
म्हैसूरच्या दसरोत्सवात सहभागी झालेले म्हैसूरचे राजे.
टॅग्स :DasaraदसराKarnatakकर्नाटकcultureसांस्कृतिकIndiaभारत