शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे देवा! म्हैसूर-चेन्नई वंदे भारतही सोडली नाही… ट्रेनवर दगडफेक, खिडक्यांच्या फोडल्या काचा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 11:29 AM

1 / 12
वंदे भारत एक्स्प्रेसवर (Vande Bharat Express) पुन्हा एकदा दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी ही घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. बंगळुरूमध्ये म्हैसूर-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे.
2 / 12
ट्रेनवर शनिवारी झालेल्या दगडफेकीत दोन खिडक्यांचे नुकसान झाले. ही घटना कृष्णराजपूर आणि बंगळुरू कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकादरम्यान घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.
3 / 12
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, या दगडफेकीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
4 / 12
20608 म्हैसूर-चेन्नई 'वंदे भारत एक्स्प्रेस' या ट्रेनमधील डब्याच्या दोन खिडक्यांचे नुकसान झाल्याचे दक्षिण पश्चिम रेल्वेने सांगितले. अलीकडच्या काळात वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
5 / 12
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बंगळुरू विभागात जानेवारीमध्ये ट्रेनवर दगडफेकीच्या 21 आणि फेब्रुवारीमध्ये 13 घटना घडल्या आहेत. देशाच्या इतर भागातही अशाच प्रकारच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत.
6 / 12
गेल्या वर्षी 11 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर-चेन्नई वंदे भारत या सेमी-हायटेक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावते. चेन्नई सेंट्रल स्टेशनवरून सकाळी 5:50 वाजता ट्रेन सुटते आणि 12:30 वाजता म्हैसूरला पोहोचते. मध्येच ते बंगळुरूच्या केएसआर स्टेशनवर थांबते.
7 / 12
यापूर्वी सिकंदराबाद-विशाखापट्टणम वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवरही दगडफेक करण्यात आली होती. त्यावेळी ती तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातून जात होती. दगडफेकीत खिडकीच्या काचा फुटल्या. या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही.
8 / 12
गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमधील मालदा येथे हावडा येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवरही दगडफेक करण्यात आली होती. ही घटना 2 जानेवारी रोजी घडली. त्यानंतर एका दिवसानंतर म्हणजे 3 जानेवारीला दार्जिलिंगहून आलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीचे प्रकरण समोर आले.
9 / 12
20 जानेवारी रोजी न्यू जलपाईगुडीहून हावडाकडे जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना होत असताना वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना थांबायला तयार नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 12

11 / 12

12 / 12

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वे