शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नावं 'इंग्लिश विंग्लिश'... पण 'हे' आठ जगप्रसिद्ध ब्रॅण्ड्स आहेत अस्सल भारतीय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 1:07 PM

1 / 8
लुईस फिलिप हा ब्रॅन्ड पुरूषांच्या कपड्यांसाठी चांगलाच लोकप्रिय आहे. या ब्रॅन्डचं नाव फ्रेंच राजा लुईस फिलिप याच्यावरून प्रेरित आहे. हा ब्रॅन्ड 1989 मध्ये सुरू करण्यात आला. मधुरा फॅशन अॅन्ड लाईफस्टाईल या कंपनीचा हा ब्रॅन्ड आहे.
2 / 8
पिटर इंग्लंड हा एक मोठा आणि लोकप्रिय ब्रॅन्ड म्हणून प्रसिध्द आहे. पिटर इंग्लंड हे नावच इंग्लिश असल्याने त्याचं ग्राहकांवर वेगळंच इंम्प्रेशन पडतं. हा सुध्दा एक भारतीय ब्रॅन्ड असून मधुरा फॅशन अॅन्ड लाईफस्टाईल या कंपनीचा आहे. ही कंपनी आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड या कंपनीचा भाग आहे.
3 / 8
फ्लाईंग मशीन हा सुध्दा पूर्णपणे एक भारतीय ब्रॅन्ड आहे. इतकेच नाहीतर हा भारतातील पहिला डेनिम ब्रॅन्ड आहे. या ब्रॅन्डची सुरूवात भारतात 1980 मध्ये सुरू करण्यात आली होती. अरविंद लाईफस्टाईल ब्रॅन्ड लिमिटेड या कंपनीचा हा ब्रॅन्ड आहे.
4 / 8
अॅलन सॉली हे नाव जरी परदेशी वाटत असले तरी हा भारतीय ब्रॅन्ड आहे. हा ब्रॅन्ड आदित्य बिर्ला ग्रुपची उपकंपनी मधुरा गारमेंट्सचा आहे. या ब्रॅन्डचे सर्वच कपडे भारतातच तयार होतात.
5 / 8
दा मिलानो हा ब्रॅन्ड लेदरच्या वस्तू आणि होम फर्निचरसाठी लोकप्रिय आहे. भारतासह ही कंपनी परदेशातही आपले प्रॉडक्ट विकतात.
6 / 8
मॉन्टी कार्लो ही भारतातील आणखी एक इटालियन नाव असलेली कंपनी. महिला आणि पुरूषांच्या कपड्यांसाठी हा ब्रॅऩ्ड चांगलाच लोकप्रिय आहे. हा ब्रॅन्ड 100 टक्के वुलनचे कपडे तयार करणा-या लुधियाना येथील नाहर ग्रुपचा आहे.
7 / 8
म्युनिक पोलो हा लहान मुलांच्या कपड्यांचा लोकप्रिय ब्रॅन्ड आहे. हे नाव सुध्दा यूरोपियन पध्दतीचं. पण ही सुध्दा एक भारतीय कंपनी आहे. केवळ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असे नाव ठेवण्यात आले आहे.
8 / 8
रॉयल एनफिल्ड ही पूर्वी ब्रिटीश मोटारसायकल मॅन्युफॅक्चरींग कंपनी होती. आता ही कंपनी भारतातील Eicher Motors Limited या कंपनीची उपकंपनी आहे. या कंपनीच्या सर्व बाईक चेन्नई येथील फॅक्टरीमध्ये तयार केल्या जातात.
टॅग्स :businessव्यवसाय