शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके हटवणार? जाणून घ्या, मोदी सरकारचा नवा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 11:23 PM

1 / 7
नरेंद्र मोदी सरकार आता भारतातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाके हटविण्यासंदर्भात विचार करत आहे. टोलनाक्यां ऐवजी आता ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिडर (ANPR) कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे वाहनांच्या नंबर प्लेट रीड करतील आणि वाहन मालकांच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून टोलचे पैसे आपोआप कापले जातील.
2 / 7
यासंदर्भात माहिती देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी म्हणाले, या योजनेसंदर्भात एक पायलट प्रोजेक्टदेखील सुरू आहे. तो सुलभ बनविण्यासाठी कायदेशीर सुधारणाही केल्या जात आहेत.
3 / 7
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वत्तानुसार, नितिन गडकरी म्हणाले, सरकारने 2019 मध्ये, सर्व कारना कंपनी फिटेड नंबर प्लेटच मिळेल, असा नियम बनवला होता. वेबसाइटसोबत बोलताना ते म्हणाले, 'गेल्या चार वर्षांत जी वाहने रस्त्यावर आली आहेत, त्यांना वेगळ्या प्रकारची नंबर प्लेट लावलेली आहे.
4 / 7
गडकरी म्हणाले, यामुळे आता नवी योजना म्हणजे, टोल प्लाझा हटविण्यात यावेत आणि त्यांच्या ऐवजी कॅमेरे लावण्यात यावेत. हे कॅमेरे नंबर प्लेट रीड करतील आणि सरळ अकाउंटमधून टोलचे पैसे कापले जातील.'
5 / 7
गडकरी म्हणाले, 'आम्ही या योजनेचा पायलट प्रोजेक्ट चालवत आहोत. मात्र, यात एक समस्या आहे, ती म्हणजे, टोल प्लाझा स्किप करणाऱ्या आणि टोल न देणाऱ्या वाहन मालकांना दंडत करण्यासंदर्भात कायद्यात कसल्याही प्रकारची तरतूद नाही. आपल्याला कायद्यात ही तरतूद करणे आवश्यक आहे.
6 / 7
एवढेच नाही, तर ज्या कारमध्ये अशा प्रकारच्या नंबरप्लेट नाहीत, त्यांच्यासाठीही आपण एक तरतूद करू शकतो. ज्या कारला अशा नंबर प्लेट नाहीत, त्यांना एका निश्चित कालावधीत नवी नंबर प्लेट लावण्यास सांगितले जाऊ शकते. मात्र, यासाठी आपल्याला एक विधेयक आणणे आवश्यक आहे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.
7 / 7
सध्या जवळपास 40,000 कोटी रुपयांच्या एकूण टोल कलेक्शन पैकी 97 टक्के कलेक्शन FASTags च्या माध्यमाने होते. उरलेले 3 टक्के FASTags चा वापर करत नसल्याने सर्वसाधारण टोल रेटपेक्षा अधिकची रक्कम भरतात. FASTags असलेल्या एका वाहनाला टोल प्लाझा पार करण्यासाठी साधारणपणे 47 सेकंद लागतात.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीtollplazaटोलनाकाNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा