शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Narendra Modi: गुजरात निवडणूक; तेव्हा स्वतः नरेंद्र मोदींनी 'ब्ल्यू बुक'चा नियम मोडून जीव धोक्यात घातलेला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 3:18 PM

1 / 12
फिरोजपूर: पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने आले आहेत. दोन्ही पक्ष या सुरक्षेतील त्रुटीवरुन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
2 / 12
पंजाब पोलिसांवर एसपीजीच्या ब्लू बुकचे पालन न केल्याचा आरोप करण्यात येतोय. पण, यापूर्वी खुद्द पीएम नरेंद्र मोदी यांनी एसपीजीचे नियम तोडले आहेत.
3 / 12
प्रकरण 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले होते.
4 / 12
येथे त्याने एसपीजीच्या ब्लू बुकच्या विरोधात जाऊन सिंगल इंजिन सी प्लेनचा प्रवास केला होता. साबरमती नदीपासून उत्तर गुजरातमधील धरोई धरणापर्यंत त्यांनी हा प्रवास केला होता.
5 / 12
यावेळी पीएम मोदी प्रवासाचा आनंद घेत होते, पण त्यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या एसपीजी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर त्रासाचे भाव दिसत होते. कारण, त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेची काळजी होती.
6 / 12
नरेंद्र मोदींनी ज्या विमानातून प्रवास केला होता, ते सिंगल इंजिन असलेले सी प्लेन पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या मानकांनुसार नव्हते.
7 / 12
त्यावेळी PM मोदींनी केवळ SPG च्या नियमांविरुद्धच प्रवास केला नाही तर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) च्या मार्गदर्शक सूचनांकडेही दुर्लक्ष केले.
8 / 12
मंत्री, एसपीजी सुरक्षा कर्मचारी आणि इतर मान्यवरांनी केवळ तेच विमान उडवावे, जे ऑपरेशनचे मानक पूर्ण करतात, असे नियमांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.
9 / 12
सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अशा उड्डाणांसाठी चांगल्या ऑपरेशनल क्षमतेसह मानक अनुरूप वैशिष्ट्यांसह ड्युअल-इंजिन विमाने वापरली जावीत.
10 / 12
पण, त्यादरम्यान पीएम मोदींनी ज्या विमानाने प्रवास केला ते डीजीसीएच्या नियमांनुसार नव्हते. त्यांनी साध्या सी प्लेनने प्रवास करुन नियम पायदळी तुडवले होते.
11 / 12
ब्लू बुक म्हणजे काय? पंतप्रधानांच्या कोणत्याही दौऱ्यापूर्वी सुरक्षेचे नियोजन हा त्यांच्या सुरक्षा प्रोटोकॉलचा भाग असतो. सुरक्षेमध्ये केंद्रीय एजन्सी आणि राज्याच्या पोलीस दलाचा समावेश असतो.
12 / 12
या संदर्भात स्पेशल प्रोटेक्शन टीम (SPG) च्या ब्लू बुकमध्ये सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे विहित केलेली आहेत. या पुस्तकात व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेबाबत कोणते नियम पाळावेत याची माहिती लिहिली आहे. त्यानुसार पंतप्रधानांच्या सुरक्षेची रचना करण्यात येते.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब