शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग की..., कुठल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा फडकवला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 3:31 PM

1 / 5
आज देश आपला ७७वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दहाव्यांदा तिरंगा फडकवला आणि देशवासियांना संबोधित केले. मात्र देशाच्या कुठल्या पंतप्रधानांनी किती वेळा तिरंगा फडकवला आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या.
2 / 5
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आहे. त्यांनी एकूण १७ वेळा तिरंगा फडकवला होता. जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा लालकिल्ल्यावर १५ रोजी नाही तर १६ ऑगस्ट १९४७ तिरंगा फडकवला होता.
3 / 5
जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. त्यांनी १६ वेळा तिरंगा फडकवला होता. १९६६ ते १९७७ दरम्यान, त्यांनी सलग ११ वेळा झेंडा फडकवला होता.
4 / 5
डॉ. मनमोहन सिंग यांनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. त्यांनी १० वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला आहे. त्यांच्या विक्रमाशी नरेंद्र मोदी यांनी बरोबरी केली आहे.
5 / 5
अटल बिहारी वाजपेयी हे लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवणारे पहिले गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. त्यांनी सलग सहा वेळा तिरंगा फडकवला होता. त्यानंतर आता नरेंद्र मोदी हे सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवणारे गैर काँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत.
टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndira Gandhiइंदिरा गांधीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीManmohan Singhमनमोहन सिंग